Saturday, July 27, 2024
Homeनगरआरक्षणाची दखल न घेतल्यास मंत्र्यांच्या घरावर मेंढ्यांचा मोर्चा

आरक्षणाची दखल न घेतल्यास मंत्र्यांच्या घरावर मेंढ्यांचा मोर्चा

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

धनगर समाजाच्या आरक्षणाची दखल राज्यसरकारने न घेतल्यास अहमदनगर जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांच्या घरावर

- Advertisement -

मेंढ्याचा मोर्चा काढणार असल्याचा इशारा धनगर समाज आरक्षण समन्वय समितीच्या वतीने विजयराव तमनर यांनी राज्य सरकारला दिला आहे.

धनगर समाजाच्यावतीने राहुरीत ढोल बजाव सरकार जगाव आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजबांधवांनी जोरदार घोषणाबाजी करीत ढोल बडवून आंदोलन केले. यावेळी तमनर बोलत होते.

तमनर म्हणाले, येत्या काही दिवसांत राज्य सरकारने धनगर आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही तर अहमदनगर जिल्ह्यातील धनगर समाजाच्यावतीने जिल्ह्यातील मंत्र्यांच्या घरावर मेंढराचा मोर्चा काढण्यात येईल व त्यांना आरक्षणाचा जाब विचारला जाईल.अशी माहिती या आंदोलनाचे प्रमुख तमनर यांनी दिली.

राहुरी तहसील कार्यालयावर धनगरी वेशामध्ये काठी व घोंगडी घेऊन धनगरी वेशात समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले. येळ कोट-येळकोट जय मल्हार, ढोल बजाव सरकार जगाव या घोषणांनी परिसर दूमदूमून गेला.

मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख, राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख उपस्थित होते.

त्यानंतर तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे धनगर समजाचा पहिला मोर्चा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या घरावर काढण्याचा ठराव करण्यात आला.

या आंदोलनाला वैशालीताई नान्नोर, अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे ज्ञानदेव बाचकर, दत्ताभाऊ खेडेकर, भारत मतकर, दादाभाऊ तमनर, सखाराम तमनर, आप्पासाहेब तमनर, मारुती बाचकर, श्रीकांत बाचकर, कोंडीराम बाचकर, रभाजी गावडे, बाळासाहेब गावडे, दिलीप तमनर, खाटेकर महाराज, वर्षाताई बाचकर, आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या