Saturday, November 16, 2024
Homeनगरराहुरीकरांनी अनुभवल्या सूर्याच्या ‘ग्रहणकला’

राहुरीकरांनी अनुभवल्या सूर्याच्या ‘ग्रहणकला’

सन 2019 या सरत्या वर्षातील अखेरचे सूर्यग्रहण

राहुरी (प्रतिनिधी) – या वर्षातील अखेरचे खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची उत्सुकता लागलेल्या खगोलप्रेमींची आभाळाच्या सावटामुळे निराशा झाली होती. मात्र, ऐनवेळी आकाशातील गडद झालेल्या ढगाचे सावट दूर होऊन निराशेचे ढगही विरळ झाल्याने राहुरीकरांना काल सकाळी खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटता आला.

- Advertisement -

सन 2019 या सरत्या वर्षातील अखेरचे सूर्यग्रहण काल गुरुवारी असल्याने अनेक हौशी खगोलप्रेमींनी ग्रहणाची खगोलीय दृश्ये पाहता यावी, यासाठी आभाळाकडे नजर लावून सोलर चष्मे, वेल्डिंगच्या काळ्या काचा, एक्स रे फिल्मच्या कॉपी घेऊन ठेवल्या होत्या. मात्र, बुधवार रात्रीपासून ढगाळ वातावरणामुळे व अवकाळी पावसाची रिमझिम सुरू झाल्याने हे ऐतिहासिक क्षण हातातून निसटतात की काय? असे निराशेचे ढग खगोलप्रेमींच्या मनात दाटून आले होते.

तर काल सकाळी ढगाळ वातावरण व पावसाचा शिडकावा सुरू झाला. त्यामुळेही निरोशेचे सावट अजून गडद झाले होते. मात्र, सकाळी 10 वाजता ढग विरळ होताच 50-60 टक्के सूर्याबिंबाचे दर्शन घडताच तमाम हौशी खगोलप्रेमी राहुरीकरांनी या ऐतिहासिक घटनेचा आनंद याची देही याची डोळा पाहिला. सूर्याचा दक्षिण-पूर्व भाग नंतर पुन्हा तेजस्वी होत गेल्याच्या छबी आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात अनेकांनी बंदिस्त केल्या. अनेकांनी घराच्या अंगणात, उंच इमारतीवर खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद घेतला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या