Saturday, May 4, 2024
Homeनगरराहुरी फॅक्टरीवर व्यापार्‍याला तोतया पोलिसांनी लुटले

राहुरी फॅक्टरीवर व्यापार्‍याला तोतया पोलिसांनी लुटले

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

तुझी गाडी बाजूला घे, तू गांजा घेऊन चालला असल्याची मला माहिती मिळाली, मला तुझी झडती घ्यायची, असे म्हणत पोलीस असल्याचे भासवून दोन अज्ञात

- Advertisement -

तोतया पोलीस बनलेल्या ठकसेनांनी राहुरी फॅक्टरी येथील व्यापार्‍याचे 4 तोळे सोने लंपास केल्याची घटना दुपारी 2 वाजता राहुरी फॅक्टरी हद्दीतील कराळेवाडी शांती चौक परिसरात घडली.त्यामुळे व्यापार्‍यांमध्ये दहशत पसरली आहे.

किराणा मालाचे व्यापारी रमेश ताथेड हे आपल्या बसस्टँड येथील किराणा दुकानातून गोणीमध्ये काही साहित्य घेऊन शांती चौकातील दुसर्‍या दुकानात जात होते. दरम्यान एका स्पीडब्रेकरजवळ पल्सर गाडी घेऊन एक भामटा त्यांना आडवा झाला व मी पोलीस असल्याचे सांगून ओळखपत्र दाखवू लागला. तुमच्या गोणीत गांजा असल्याची माहिती मला मिळाली असून मला तुमची झडती घ्यायची, असा त्या व्यापार्‍याला दम भरला.

दरम्यान, आपला लुटीचा डाव यशस्वी व्हावा, यासाठी त्या ठिकाणी त्या भामट्याचा एक साथीदार तेथे येऊन थांबला. भामट्यांच्या आदेशावरून तोही स्वतःचे खिसे उघडून त्याला दाखवू लागला. ही झाडाझडतीचे सत्र सुरू असताना त्याने ताथेड यांना अगोदर तिथे गोणी रिकामी करायला सांगितली. नंतर गळ्यातली सोन्याची चेन व अंगठी गोणीत टाकण्यास सांगितले.

दरम्यान, काही कळण्याच्या आत भांबावलेल्या ताथेड यांच्याकडून त्या भामट्याने गळ्यातील सोन्याची चैन व अंगठी घेऊन तेथून पोबारा केला. याबाबतची फिर्याद राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या