Sunday, September 8, 2024
Homeनगरराहुरीच्या पूर्वभागातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

राहुरीच्या पूर्वभागातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

वळण |वार्ताहर| Valan

राहुरी तालुक्यात शेतकर्‍यांनी कपाशी, सोयाबीन, तूर, मका, ऊस इत्यादी पिके घेतली. त्याचप्रमाणे पेरणी देखील वेळेवर झाली. त्याची उगवण देखील चांगल्यापैकी झाली. त्याची वाढही भरपूर झाली. मात्र, गेल्या आठवड्याभरात पावसाने दडी मारल्याने ही पिके सुकून चालली आहेत. त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहे.

- Advertisement -

मुळा डाव्या कॅनालला पाणी आले. मात्र शेतकरी कपाशी व सोयाबीनला पाणी घेण्यास उत्सुक नाही. शेतकर्‍यांनी ऊस, मका, घासासाठी पाणी घेण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी संजय शेळके म्हणाले, पाऊस पडल्यास पिकाला उपयुक्त होईल. शेतकरी धनराज भास्कर जाधव म्हणाले, गेल्या वर्षापासून सोयाबीनचे उत्पन्न चांगल्यापैकी मिळत आहे व त्याला भावही देखील चांगल्यापैकी मिळत आहे.

यापूर्वी राहुरी तालुक्यामध्ये उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. मात्र ऊस तोडणी करताना हाल झाली. त्यामुळे शेतकरी आता सध्या भुसार पिकाकडे वळलेला आहे. प्रगतशील शेतकरी सीताराम गोसावी म्हणाले, ऊस तोडणीसाठी गाव पुढार्‍यांपासून तर थेट डायरेक्टर, चेअरमन यांच्याकडे वशिला लावावा लागतो. तर लेबरला व मास्तरला त्यामुळे शेतकरी राजा वैतागलेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या