Monday, May 27, 2024
Homeनगरराहुरीत किराणा दुकान फोडून रोख रकमेसह मुद्देमाल चोरीला

राहुरीत किराणा दुकान फोडून रोख रकमेसह मुद्देमाल चोरीला

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहरातील नवीपेठ येथे दिनांक 8 ऑगस्ट रोजी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने प्रवीण बेदमुथ्था यांच्या किराणा दुकानाच्या छताचा पत्रा तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील चार ते पाच हजार रुपये रोख रक्कम व सुमारे 40 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. प्रवीण रमेशलाल बेदमुथ्था यांचे राहुरी शहरातील नवीपेठेत किराणा दुकान आहे.

- Advertisement -

प्रवीण बेदमुथ्था हे 7 ऑगस्ट रोजी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. 8 ऑगस्ट रोजी पहाटेच्या दरम्यान एका अज्ञात चोरट्याने प्रवीण बेदमुथ्था यांच्या दुकानच्या छतावरील पत्रा उचकटून त्याखाली असलेली लोखंडी जाळी वाकवून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील ड्राव्हर व इतर सामानाची उचकापाचक केली. त्यावेळी त्याने दुकानातील 4 ते 5 हजार रुपये रोख रक्कम व सुमारे 40 हजार रुपयांचा सिगारेट व बिडीचा मुद्देमाल चोरून पसार झाला. सदर चोरीची पूर्ण घटना दुकानातील सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झाली असून त्यात आरोपी चोरी करताना स्पष्ट दिसत आहे.

शहरात अनेक ठिकाणी दुकाने फोडून चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र आजपर्यंत एकाही आरोपीचा शोध लागला नाही. सदर आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त न केल्यास राहुरी व्यापारी असोसिएशनच्यावतीने राहुरी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने करण्यात येईल, असा इशारा प्रकाश पारख यांनी दिला आहे.

प्रवीण रमेशलाल बेदमुथ्था यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या