Monday, June 24, 2024
Homeनगरराहुरी खरेदी-विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

राहुरी खरेदी-विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

राहुरी तालुका खरेदी-विक्री संघाने नगर-मनमाड राज्य मार्गांवर बांधलेल्या व्यापारी संकुलास ‘कै. डॉ. दादासाहेब तनपुरे व्यापारी संकुल’ असे नामकरण करण्याचा ठराव संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन युवराज सुधाकर तनपुरे यांनी दिली.

राहुरी तालुका खरेदी विक्री संघाची 68 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात चेअरमन युवराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन त्यात वरील ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक माजी चेअरमन सुधाकर तनपुरे, व्हा. चेअरमन संतोष पानसंबळ, ज्येेष्ठ संचालक आप्पासाहेब कोहकडे, विष्णू तारडे, ज्ञानदेव हारदे, सखाराम कुमकर, आबासाहेब वाघमारे, संतोष खाडे, बाळकृष्ण पवार, संतोष तनपुरे, दत्तात्रय गडाख, अनिल शिंदे, सुभाष डुक्रे, रावसाहेब शेळके, मनोज लहारे आदी संचालक उपस्थित होते.

युवराज तनपुरे म्हणाले की, अहवाल सालात संस्थेकडे 1 कोटी 4 लाख रुपयाच्या ठेवी असून शासनाच्या हमीभाव योजनेतर्गत 1457 क्विंटल माल खरेदी केली असून त्यापोटी संस्थेने शेतकर्‍यांच्या खात्यावर 70 लाख रुपयाचे पेमेंट वर्ग केले. अहवाल सालात संस्थेने सभासद शेतकर्‍यांसाठी 110 टन खतांची खरेदी करून 103 टन खताची विक्री केली आहे. त्यापोटी संस्थेस 9 लाख 66 हजार रुपये नफा झाला. संस्थेने कार्यक्षेत्रात बांधलेल्या व्यापारी संकुलातील सर्व गाळे विकले गेले आहे.

नगर-मनमाड रस्त्यावर चांगल्या प्रकारचे सुसज्य भव्य व्यापारी गाळे बांधले असून सर्व गाळे सुरु झाल्याने मोठी बाजारपेठ तयार झाली आहे. या व्यापारी संकुलाचे मूल्यांकन 1 कोटी 56 लाख रुपये असून या व्यापारी संकुलाचे नामकरण डॉ. कै. दादासाहेब तनपुरे व्यापारी संकूल असे करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.येत्या काही दिवसात संस्थेच्या दुसर्‍या फेजचे बांधकाम सुरु करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

सभेत आबासाहेब वाघमारे, आप्पासाहेब कोहकडे, कांतीराम वराळे यांनी मनोगत व्यक्त केले.सभेसमोरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. या सभेस आबासाहेब शेटे, उत्तमराव दौंड, सोपान तनपुरे, भास्करराव म्हसे, गोकुळ डुक्रे, गोपाल तनपुरे, लक्ष्मण म्हसे, दशरथ तनपुरे, सचिन शिंदे, ज्ञानदेव नालकर, देवदत्त पाटोळे, लक्ष्मण तनपुरे, संदीप पानसंबळ, विजय माळवदे, स्वप्नील कडू, युसूफ आत्तार, शुभम काळे, शहाजी जाधव, संदीप कडू आदी उपस्थित होते.अहवाल वाचन सचिव बाळासाहेब फुलसौंदर यांनी केले. तर आभार आप्पासाहेब कोहकडे यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या