Friday, August 28, 2026
HomeनगरCrime News : मोमीन आखाडा येथे वयोवृद्ध इसमावर गोळीबार करणारा आरोपी जेरबंद

Crime News : मोमीन आखाडा येथे वयोवृद्ध इसमावर गोळीबार करणारा आरोपी जेरबंद

कट्ट्यासह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे वयोवृद्ध इसमावर जीवघेणा गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांत मुळा धरण परिसरातून ताब्यात घेतले. आरोपीकडून गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, मोबाईल व अन्य साहित्य असा एकूण 2 लाख 4 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडू गंगाराम कोहकडे (रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी) यांनी यापूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या रागातून आरोपी प्रविण बाबासाहेब कोहकडे (वय 22) याने गुरुवारी (दि. 29) सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास गावठी कट्ट्यातून गोळीबार केला.
या गोळीबारात दगडू कोहकडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता.

या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 109 तसेच आर्म अ‍ॅक्टच्या कलम 7/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले. तपासादरम्यान आरोपी बारागाव नांदूर ते मुळा धरण परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून काळे जॅकेट परिधान केलेल्या आणि विनानंबर मोटारसायकलवरून फिरणार्‍या संशयितास ताब्यात घेतले.

चौकशीअंती त्याची ओळख प्रविण बाबासाहेब कोहकडे अशी पटली. झडतीदरम्यान आरोपीकडून 30 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, 4 हजार रुपये किमतीची चार जिवंत काडतुसे, मोबाईल फोन, कट्टा ठेवण्यासाठी वापरले जाणारे लेदर पाऊच तसेच काडतुसांच्या रिकाम्या पुंगळ्या असा एकूण 2 लाख 4 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेल्या आरोपीस पुढील तपासासाठी राहुरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दहा वर्षांच्या अटीमुळे निवडणुकीतून बाहेर पडलेल्यांना संधी?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, सहकार संस्था निवडणूक नियम 2014 च्या 10 मधील...