राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी राहुरीच्या नगराध्यक्षपदी जनसेवा आघाडीच्या विद्यमान नगरसेविका सौ. अनिताताई दशरथ पोपळघट यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली.
जनसेवा आघाडीचे माजी नगराध्यक्ष नगरसेवक अनिल कासार यांनी नगराध्यक्षपदासाठीचा भरलेला आपला अर्ज गुरुवारी दुपारी मागे घेतल्याने निवडणुकीची फक्त औपचारिकता शिल्लक होती. काल (शुक्रवार) दुपारी दोन वाजता प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सौ. अनिताताई पोपळघट यांची बिनविरोध निवड त्यांनी जाहीर केली.
मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे यांनी त्यांना मदत केली. ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसाद तनपुरे, अरुण तनपुरे, डॉ.उषाताई तनपुरे व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व सर्व नगरसेवकांनी जो विश्वास दाखवून नगराध्यक्षपदाची संधी दिली त्या संधीतून शहराला जास्तीत जास्त सोयीसुविधा व प्रगतिपथावर नेण्याचे काम करेल, असा विश्वास निवडीनंतर सौ. पोपळघट यांनी व्यक्त केला.
यावेळी नगरसेविका सौ. सुमती सातभाई, उपनगराध्यक्ष राधाताई साळवे, सौ. संगीताताई आहेर, सौ. मुंडे, नंदकुमार तनपुरे, सूर्यकांत भुजाडी, प्रकाश भुजाडी, गजानन सातभाई, दशरथ पोपळघट, अशोक आहेर, संजय साळवे, सौ. ज्योती तनपुरे, विलास तनपुरे, किशोर जाधव, संदीप सोनवणे, शिवाजी डवले, संतोष आघाव, अनिल कासार आदींसह नगरसेवक, कार्यकर्ते, कर्मचारी उपस्थित होते. सौ. पोपळघट यांच्या निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. विरोधी परिवर्तन आघाडीचे सहा नगरसेवकांपैकी कोणीही निवड प्रक्रियेकडे फिरकले नाही. निवडीनंतर सौ. पोपळघट यांचा विविध कार्यकर्ते, संघटनांसह मान्यवरांनी सत्कार केला.