Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमRahuri News : मुळा नदी पात्रात अज्ञाताचा मृतदेह आढळला, घातपात कि आत्महत्या?...

Rahuri News : मुळा नदी पात्रात अज्ञाताचा मृतदेह आढळला, घातपात कि आत्महत्या? पोलिसांकडून तपास सुरू

आरडगाव । वार्ताहर

राहुरी तालुक्यातील आरडगाव शिवारामध्ये मुळा नदी पात्रात अंदाजे ३५ वर्षे वयोगटातील अज्ञात इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी तात्काळ राहुरी पोलिसांनी धाव घेतली परिसराची पाहणी करून मृतदेह शिव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत समजलेली माहिती अशी की, आरडगाव येथील काळे- देशमुख मुळा थडी परिसरात आज मंगळवार दिनांक.७ जानेवारी रोजी सकाळी येथील एका शेतकऱ्याला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलीस पाटील लक्ष्मण जाधव दिली.

सदर खबर राहुरी पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सुरेश सय्यद, संभाजी बडे, प्रविण खंडागळे, रोहित पालवे आदि पोलीस पथकाने धाव घेतली मृतदेह पाण्यातून बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. दुपारी उशिरापर्यंत मात्र मृतदेहाची ओळख पटली नव्हती. अंदाजे 35 ते 40 वयोगट असलेला व अंगावर निळा शर्ट व काळी पॅंट असा पेहराव असलेला हा इसम आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...