Saturday, May 18, 2024
Homeनगरतक्रार घेऊन आलेल्या महिलेवर पोलीस उपनिरीक्षकाकडूनच अत्याचार, राहुरीमध्ये खळबळ

तक्रार घेऊन आलेल्या महिलेवर पोलीस उपनिरीक्षकाकडूनच अत्याचार, राहुरीमध्ये खळबळ

राहुरी | तालुका प्रतिनिधी

राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सजन्नकुमार नाऱ्हेडा यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असुन राहुरी तालुक्यातील उत्तरेकडील एका गावातील पिडीत महिलेने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

- Advertisement -

याबाबत सदर पीडित महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, देवळाली प्रवरा येथील एका व्यक्तीच्या विरुद्ध जमीन खरेदीत माझी फसवणूक केलेबाबत तक्रारी अर्ज देण्यासाठी देवळाली प्रवरा पोलीस दूरक्षेत्र येथे गेले होते. तेव्हा तेथे मला एका अनोळखी इसमान मला एक मोबाईल नंबर देऊन हे राहुरी पोलीस स्टेशनचे साहेब आहेत, त्यांना तुम्ही फोन करा ते तुमची तक्रार घेतील असे सांगितल्याने. मी माझ्या मोबाईल वरून फोन लावुन मी त्यांना माझे तक्रारी अर्जाबाबत त्यांना सांगितले असता त्यांनी मला दोन दिवसानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये येणास सांगीतले. त्यानंतर मी राहुरी पोलीस स्टेशनला नार्हेडा साहेबांचे केबीन मध्ये माझी तक्रार सांगण्यासाठी गेले. त्यांना मी माझे तक्रारी अर्जाची हकिगत सांगितली. त्यानंतर ते म्हणाले की, तुमचे काम मी करून दिल्यास यामध्ये माझा काय फायदा आहे? असे विचारले. तेव्हा मी त्यांना पन्नास हजार रुपये देईल असे म्हणाले. ते मला म्हणाले की, पैशा व्यतिरीक्त मला काय पाहिजे आहे ते समजून घ्या. नंतर त्यांनी माझा तक्रारी अर्ज टाईप केला व तो ठाणे अंमलदार यांचेकडे देण्यास लावला मी सदरचा तक्रारी अर्ज ठाणे अंमलदार यांचेकडे देवून यावर पोहच घेवुन माझे घरी निघुन गेले. त्यानंतर आठ दिवसांनी मी राहुरी पोलीस स्टेशनला माझे तक्रारी अर्जाबाबत चौकशी करण्यासाठी आले व पोलीस स्टेशन समोर उभी असताना नार्हेडा साहेबानी त्यांचे मोबाईल नंबरच्या व्हाटसअप वरुन मला मेसेज केला होता. त्यानंतर ते मला व्हाटसअपवर तू माझ्याशी मैत्री करशील का असे मेसेज करू लागले. त्यानंतर दि. 08 जुलै 2023 रोजी नार्‍हेडांच्या विरुध्द एसपी साहेबांकडे तक्रारी अर्ज केला होता. त्यानंतर देखील त्यांनी मला व्हाईस कॉल करून तु माझ्या विरुध्द तक्रारी अर्ज का केला आहे? असे म्हणून तुझ्या विरुध्द मी गुन्हा दाखल करील, अशी धमकी देवू लागले. तसेच व्हाइस कॉल करुन तु जर माझ्याकडे आली नाही तर मी तुझ्या घरी येवुन तुझ्या मुलासमोर मी काहीपण कृत्य करीन अशी धमकी देवु लागले. त्यानंतर दि. 17 जुलै 2023 रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास मी कामानिमीत्त तहसिल कार्यालय राहुरी येथे आले व झेरॉक्स काढण्यासाठी तहसिलच्या बाहेर चिंचेच्या झाडाखाली उभी असताना मला तेथे नार्‍हेडा म्हणाले , तुला आता माझ्या सोबत रुमवर यावे लागेल तेव्हा मी त्यांना नकार दिल्यावर ते मला म्हणाले की, रात्री मी तुझ्या घरी येवुन तुझ्या मुलासमोर काहीपण करील अशी धमकी दिली म्हणुन मी दुपारी 4 वा. सुमारास माझे स्कुटी गाडीवर त्यांचे राहुरी स्टेशन रोडला असलेल्या रूमवर गेले तेथे त्यांनी माझ्यावर जबरदस्तीने शारिरीक संबंध केलेले आहे. असा आरोप पीडित महिलेने केला आहे.

Crime News : जोधपूर हादरलं! ६ महिन्यांच्या चिमुकल्यासह चौघांना संपवलं अन् अंगणात फरफटत आणून पेटवलं

सदर महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नार्हेडा याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या