Saturday, July 27, 2024
Homeनगरविद्यापीठ सुरक्षा रक्षकाने दोन चोरट्यांना पाठलाग करून पकडले

विद्यापीठ सुरक्षा रक्षकाने दोन चोरट्यांना पाठलाग करून पकडले

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी कृषी विद्यापीठात विद्यापीठाच्या जागेतील तार कंपाउंडचे लोखंडी अँगल चोरून नेत असताना विद्यापीठाचे सुरक्षा रक्षकांनी आरोपींचा पाठलाग करून मुद्देमालासह पकडले. सतीश सुधाकर आढाव, वय 34 वर्षे, रा. वरवंडी, ता. राहुरी. हे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात रखवालदार म्हणून काम करतात. त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विद्यापीठात नर्सरी येथील तारकंपाउंडचे लोखंडी अँगल कापण्याचा आवाज आला.

- Advertisement -

तेव्हा त्यांनी ताबडतोब सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांना माहिती दिली. त्यावेळी तेथे काही सुरक्षा रक्षक आले. त्यांना पाहून आरोपी 10 हजार रुपये किंमतीचे लोखंडी अँगल घेऊन मोटरसायकलवर पळाले. त्यावेळी संदीप दामोदर धसाळ, जयेश गुलाब पवार, राहुल उत्तम पवार या सुरक्षा रक्षकांनी मोटरसायकलवर आरोपींचा पाठलाग करून त्यांना राहुरी खुर्द परिसरात पकडले. त्यावेळी त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला.

या घटनेबाबत रखवालदार सतीश सुधाकर आढाव यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अशोक श्रीधर चंदनशिव, वय 40 वर्षे व ताहेर अनिस शेख, वय 25 वर्षे, दोघे रा. फार्मा कॉर्टर, ता. राहुरी. या दोघांवर गु.र.नं.1161/2023 भादंवि कलम 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या