Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमRahuri : राहुरीतील वर्धमान ज्वेलर्सच्या जबरी चोरीचा पर्दाफाश

Rahuri : राहुरीतील वर्धमान ज्वेलर्सच्या जबरी चोरीचा पर्दाफाश

दोन आरोपी ताब्यात || जवळपास 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी पोलीस स्टेशन आणि यवत पोलीस स्टेशनच्या संयुक्त तपास पथकाने वर्धमान ज्वेलर्स येथे झालेल्या मोठ्या सोन्याच्या चोरीचा उलगडा केला आहे. 14 जुलै 2025 रोजी या दुकानातील 60 लाख 45 हजार रुपयांहून अधिक किमतीचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरीला गेला होता. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. या जबरी चोरीच्या घटनेत प्राथमिक तपासात आरोपींबाबत कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नव्हता. मात्र, तांत्रिक विश्लेषण आणि सखोल चौकशी केली.

- Advertisement -

हा गुन्हा यवत पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा पुणे यांच्या तक्रारीनुसार उघडकीस आला आहे. त्यामुळे दोन्ही पोलिस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने समांतर तपास सुरू केला. तपासात आरोपी विकीसिंग जालिंदर सिंग कल्याणी (पुणे), अतुल सुरेश खंडागळे (पुणे) आणि त्यांच्या सहा साथीदारांनी हा गुन्हा केले असल्याचे निष्पन्न झाले. विकीसिंग हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुमारे 92 गुन्हे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर विशेष लक्ष देण्यात आले होते.

YouTube video player

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लोणीकंद (पुणे) येथे आरोपींचा शोध घेत अत्यंत शिताफीने त्यांना ताब्यात घेतले. आरोपींना प्रथम यवत पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आणि नंतर राहुरी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातही ताब्यात घेतले गेले. पोलिसांनी आरोपींकडून 4 लाख 95 हजार 269 रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. 25 जुलै 2025 रोजी आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीसाठी विनंती करण्यात आली. न्यायालयाने 30 जुलै 2025 रोजी पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आणि त्यानंतर 2 ऑगस्ट 2025 पर्यंत ती वाढवण्यात आली आहे.

राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, हवालदार, विकास साळवे, सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, सतीश कुर्‍हाडे, नदीम शेख, सचिन ताजणे यांचे या तपासात महत्त्वाचे योगदान आहे. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सचिन धनात, दरेकर यांचेही सहकार्य लाभले. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पुढील तपास अजूनही सुरू असून, आरोपींच्या इतर गुन्ह्यांबाबतही तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...