Sunday, September 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजकांदा वाहतुकीबाबत रेल्वे प्रशासन-व्यापारी बैठकीत महत्वाचा निर्णय

कांदा वाहतुकीबाबत रेल्वे प्रशासन-व्यापारी बैठकीत महत्वाचा निर्णय

- Advertisement -

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

रेल्वेतून कांदा देशभर पाठवण्याबाबत नाशिकरोड स्थानक येथे रेल्वे प्रशासन आणि कांदा व्यापारी यांची महत्त्वाची बैठक शनिवारी (दि.21) झाली. बैठकीत व्यापार्‍यांनी 2024 च्या नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून कांद्याच्या लोडिंगला प्रारंभ करण्याचे आश्वासन दिले.

रेल्वेतून कांदा विक्री केली जाणार असल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक अरविंद्र मालखेडे आणि भुसावळ रेल्वे विभागाचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला लासलगाव, मनमाड आणि अंकई येथील कांदा व्यापार्‍यांची उपस्थिती होती. या बैठकीचा मुख्य उद्देश रेल्वेतून कांद्याच्या लोडिंग प्रक्रियेस प्रारंभ करणे हा होता. बैठक फलदायी ठरली. बैठकीत व्यापार्‍यांनी 2024 च्या नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून कांद्याच्या लोडिंगला प्रारंभ करण्याचे आश्वासन दिले.

रेल्वेतून देशभरात याआधीही कांदा पाठवण्यात आला होता. बांगलादेशाला नाशिकरोड व अन्य रेल्वे स्थानकातून कांदा निर्यात करण्यात आली होती. आता पुन्हा रेल्वेतून कांदा वाहतूक होणार असल्याने रोजगार निर्मितीबरोबरच रेल्वेला महसूल मिळणार आहे. कांदा व्यापारी व शेतकर्‍यांचाही लाभ होणार आहे.
मुख्य वाणिज्य प्रबंधक अरविंद मालखेडे यांनी नाशिक, लासलगाव आणि कसबे सुकेणे रेल्वे स्थानकांची पाहणी करून समस्या जाणून घेतल्या.

या निरीक्षणाद्वारे स्थानकांवरील आवश्यक पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. ‘एक झाड आईच्या नावावर’ वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत नाशिकरोड स्थानक येथे वृक्षारोपण करण्यात आले. स्टेशन मास्तर मनोज श्रीवास्तव यांच्यासह प्रमुख अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या