Monday, May 20, 2024
Homeजळगावभुसावळ : खांबावर धडकून रेल्वे कर्मचार्‍याचा मृत्यू

भुसावळ : खांबावर धडकून रेल्वे कर्मचार्‍याचा मृत्यू

भुसावळ Bhusawal :

लोखंडी खांबावर आदळून रेल्वे कर्मचार्‍याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.14 रोजी रात्री 9 वाजे दरम्यान येथील रेल्वे दवाखान्याजवळील नर्सेस कॉलनी जवळ घडली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेतील सी अ‍ॅण्ड डब्ल्यु विभागाती कर्मचारी राकेश प्रकाश वीसे (रा.हनुमान नगर) हे ड्युटी आटोपून घरी परतत असतांना रेल्वे हॉस्पिटल ते डिआरएम कार्यालय चौका दरम्यानच्या नर्सेस कॉलनी जवळील लोखंडी खांबवर राकेश वीसे यांची दुचाकी धडकून झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले.

त्यात त्यांचा घटनास्थळीच दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत घटनेची माहिती मिळता शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी सोपान पाटील, विशाल मुळे, विशाल लाड यांनी तात्काळ घटनास्थी धाव घेतली. याबाबत रात्री उशीरापर्यंत शहर पोलिसात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या