संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील कोल्हेवाडी (Kolhewadi) येथील तरुणाला रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष (Railway Job Lure) दाखवून येवला (Yeola) येथील दोघांनी आठ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी (Sangamner Taluka Police) गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की येवला (Yeola) तालुक्यातील वडगाव पंगू येथील महेश पोपट शिरसाठ व विशाल निवृत्ती घाडगे या दोघांनी सन 2022 मध्ये कोल्हेवाडी येथील गणेश बाळासाहेब गुंजाळ (वय 32) यास रेल्वे विभागात नोकरीला लावण्याचे आमिष (Railway Job Lure) दाखवून प्रत्येकी चार लाख असे एकूण आठ लाख रुपये घेऊन फसवणूक केली आहे. यामुळे गणेश गुंजाळ याने तालुका पोलिसांत धाव घेऊन संपूर्ण हकीगत कथन केली.
त्यावरुन पोलिसांनी वरील दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शलमोन सातपुते हे करत आहे. या घटनेमुळे तरुणाला मोठा धक्का बसला आहे.