Sunday, September 22, 2024
Homeक्राईमरेल्वेचे धातू चोरणारी चौघांची टोळी पडकली

रेल्वेचे धातू चोरणारी चौघांची टोळी पडकली

नगर रेल्वे पोलिसांची पाथर्डीत कारवाई || मुद्देमाल जप्त

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

- Advertisement -

रेल्वेचे मौल्यवान धातूचे साहित्य चोरी करणार्‍या चार जणांच्या एका टोळीला पाथर्डीतून नगरच्या रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रेल्वे पोलिसांना या आरोपीच्या शोधकामी पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने मदत केली आहे.

महेश सुधाकर भापकर वय 25 (काळे वस्ती), राहुल पांडुरंग दंडवते वय 25 (रा. शेवाळे गल्ली), गोरक्ष राजेंद्र केकाण वय 29 (रा. निवडुंगे), बाळासाहेब तुकाराम गर्जे वय 45 (रा. कापशी ता. आष्टी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचे नावे असून त्यांच्याकडून चोरी केलेले सुमारे सव्वा दोनशे किलो तांब्याची तार व चार चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. रविवारी रेल्वे पोलीस व पाथडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. महेश भापकर यांच्या घरातून मुद्देमाल व या चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.नगर ते परळी रेल्वे मार्गाचे काम सध्या सुरू आहे. त्या कामावरील असलेली तांब्याची तार या आरोपींनी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील हद्दीमध्ये चोरी केली होती.

त्याबाबत नगर येथील रेल्वे पोलिसांकडे काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध रेल्वे पोलिसांना लागला होता. मात्र आरोपी मिळत नसल्याने पाथर्डी पोलिसांची मदत घेऊन या आरोपींना रविवारी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या कारवाईमध्ये रेल्वेचे पोलीस निरीक्षक सतपाल रोर, पोलीस उपनिरीक्षक विकेश तिमांडे, हेडकॉन्स्टेबल के. एस. फुलारी, जालिंदर नागुडे, निलेश पाटील, सचिन आव्हाड तर पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक कृष्णा बडे, विनोद मासळकर हे कारवाईत सहभागी झाले होते.या तांब्याच्या तारेची किंमत बाजारात प्रति किलो एक हजार रुपये असून अंदाजे दोन ते सव्वा दोन लाख रुपयांची तार पकडण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या