Sunday, May 26, 2024
Homeमहाराष्ट्रपावसाचा जोर वाढणार! ‘या’ भागाला मिळाला अलर्ट... वाचा, काय म्हटलंय हवामान विभागानं?

पावसाचा जोर वाढणार! ‘या’ भागाला मिळाला अलर्ट… वाचा, काय म्हटलंय हवामान विभागानं?

मुंबई | Mumbai

राज्यातील सर्वच भागात मागील दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. जुलै महिन्यात धो-धो पडलेला पाऊस ऑगस्ट महिन्यात गायब झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मात्र सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मागील काही दिवसांपासून ओढ दिलेला पाऊस राज्यभरात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

सध्याच्या गतीला पाऊस धीम्या गतीनं राज्याच्या काही भागांमध्ये सक्रिय होत असून, सध्या तो विदर्भात परतल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. विदर्भात परतलेला हा पाऊस चांगल्या मुक्कामासाठी आला असून, २० ऑगस्ट आणि त्यानंतरचेही काही दिवस तो या भागात तूफान बरसणार असल्याचा इशारा दिला आहे. पावसाच्या धर्तीवर पुढील २४ तासांसाठी विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. २० ऑगस्टपर्यंत पावसाचा हा इशारा लागू असेल. दरम्यान गुरुवारी मध्यरात्रीपासून नागपुरात पाऊस सुरू झाल्यामुळं आता आठवड्याचा शेवट इथं पाऊसच करणार हे स्पष्ट होता दिसत आहे.

राज्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडला होता. विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना या पावसाचा मोठा फटका बसला होता. अन्य जिल्ह्यात मात्र फारसा पाऊस पडला नाही. आताही ऑगस्ट महिना अर्धा उलटून गेला तरी पावसाचा कुठेच पत्ता नाही. खरीप हंगामही संकटात सापडला आहे. त्यामुळे पाऊस कधी होईल याची प्रत्येकजण वाट पाहत होता. जवळपास वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर गुडन्यूज मिळाली आहे. राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे लवकरच पाऊसधारा कोसळतील असा अंदाज आहे.

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये हाहाकार

हिमाचल आणि उत्तराखंडसारख्या राज्यांमध्ये पावसानं मागील काही दिवासांत मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्तहानी केली आहे. संपूर्ण देशाचं हवामान पाहायचं झाल्यास शनिवारी पूर्व भारत आणि रविवार सोमवारी पूर्वोत्तर भारतामध्ये पावसाची हजेरी असेल. दक्षिण भारतामध्येही मेघगर्जनेसह पावसाची हजेरी पाहायला मिळेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या