Monday, June 24, 2024
Homeनगरपाऊस आला पण उशीर झाला...

पाऊस आला पण उशीर झाला…

लोणी |वार्ताहर| Loni

- Advertisement -

पावसाळा सुरू होऊन 75 दिवस झाले आहेत. तर खरिपाच्या पेरण्यांना 60 दिवस. पावसाअभावी खरिपाचे पीक हातातून गेले आहे.आता आलेला पाऊस या पिकांना वाचवू शकत नाही. एक पीक हातातून गेल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. मात्र हा पाऊस नद्या,नाले,ओढ्याना वाहते करू शकला तर तो रब्बीच्या हंगामासाठी आशेचा किरण ठरू शकतो.

श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर, पारनेर, श्रीगोंद्यात दुधाची तपासणी

यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी हवामान खात्यासह अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेला अंदाज निसर्गाने चुकीचा ठरवला. शेतकर्‍यांचाही स्वतःचा अंदाज असतो तोही चुकीचा ठरला. 24 मे पासून सुरू झालेल्या पावसाळ्याचे 75 दिवस पूर्ण झाले आहेत. 25 जून ते 10 जुलै या कालावधीत अनेक शेतकर्र्‍यांनी खरीप पिकांची पेरणी केली. काहींना जमिनीत पुरेशी ओल होती तर काहींनी धाडस करून अपुर्‍या ओलीवर पेरणी केली. काहीजण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार 100 मी.मी.पाऊस पडण्याची वाट बघत बसले. नगर जिल्ह्याच्या अनेक गावांत तर पाऊसच पडला नाही. अशा विचित्र परिस्थिती यावर्षीचा प्रचंड नुकसानकारक खरीप हंगाम आपल्याला बघायला मिळत आहे.

खा. विखेंकडून एमआयडीसी भूसंपादनाचा आढावा

राहाता, राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, पारनेर, सिन्नर या तालुक्यातील अनेक गावातील शेतकर्‍यांनी पाऊस पडण्याआधीच बियाणे, खते खरेदी करून ठेवली. मात्र पाऊस न पडल्याने ती घरात तशीच पडून आहेत. ज्यांनी पुरेशा ओलीवर पेरणी केली त्यांची उगवण चांगली झाली. मात्र नंतर पाऊसच न आल्याने पिके करपून गेली. ज्यांनी कमी ओलीवर पेरणीचे धाडस केले त्यांची उगवण पन्नास टक्केही झाली नाही आणि दुबार पेरणीसाठी पाऊसच न झाल्याने पिकच हातातून गेले.

हजारो एकर जमिनीवरील खरीप पिकांचे सध्याचे चित्र पाहिल्यावर मन सुन्न तर होतेच पण फार मोठ्या दुष्काळाची जाणीव झाल्याशिवाय रहात नाही. खरीप पिकांना फार पावसाची गरज नसते. पण दहा-विस मिलिमीटर सुद्धा पाऊस पडला नाही. विहिरींमध्ये पाणी नाही, वीज टिकत नाही आणि पाऊस पडत नाही अशा भीषण परिस्थितीत शेतकरी फक्त डोक्याला हात लावून बसण्यापालिकडे काहीच करू शकत नाही. खरीप हंगाम वाया गेला. डोक्यावर कर्जाचा बोजाही झाला आणि आता कुठे पाऊस सुरू झालाय पण या पिकांना वाचवू शकत नाही. 60 दिवसांची झालेली पिके कितीही पाऊस झाला तरी उभी राहू शकत नाहीत.

श्रीमंत बाजाराच्या अमिषाने शिक्षकांची आर्थिक लूट

सध्याचा पाऊस सर्वदूर आणि नद्या, नाले, ओढे यांना दुथडी भरून वाहू शकला तर पुढच्या रब्बीच्या पिकांसाठी तो आशेचा किरण ठरेल. राज्यातल्या अनेक धरणात चिंताजनक पाणी साठा आहे. त्यात चांगली भर पडली तर पिण्याच्या पाण्याचा आणि काही प्रमाणात शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.त्यासाठी पुढचे तीन आठवडे दमदार पाऊस पडण्याची गरज आहे. तसे झाले नाही तर राज्याला अभूतपूर्व अशा दुष्काळाचा सामना करण्याची वेळ येऊ शकते. शेतकर्‍यांसाठी हे वर्ष आव्हानात्मकच असेल यात शंका नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या