Saturday, July 27, 2024
HomeUncategorizedपुन्हा तीन-चार दिवस पावसाचा अंदाज

पुन्हा तीन-चार दिवस पावसाचा अंदाज

औरंगाबाद – Aurangabad

औरंगाबाद आणि मराठवाडा (Aurangabad and Marathwada) भागात पावसाचा जोर ओसरला असून आज बहुतांश भागात सूर्याचे दर्शन घडले. आता 3 सप्टेंबरदरम्यान पावसाचे प्रमाण कमी होणार असून आकाश स्वच्छ राहिल. मराठवाड्यात (Maharashtra, Vidarbha and Marathwada) काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. मात्र पुन्हा 6 सप्टेंबरनंतर तीन-चार दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

औरंगाबाद शहरात एमजीएम जेएनईसी भागात 26.2 मिमी तर गांधेली भागात 21.3 मिमी पावसाची नोंद झाली. तर 1 सप्टेंबर रोजी एमजीएम जेएनईसी भागात 6.1 मिमी तर गांधेली भागात 23.4 मिमी पावसाची नोंद झाली.

औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील महसूल मंडळांपैकी 7 मंडळांत अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिले आहेत. कन्नड तालुक्यातील भिलदरी तलाव फुटल्याने भोवतालच्या शेतातील पिके उद्ध्वस्त झाली. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेत त्यांची व्यथा जाणून घेतली. तसेच गावनिहाय पंचनामे करण्याचे आदेश दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या