Tuesday, June 17, 2025
Homeमुख्य बातम्यामनपा बसविणार सहा ठिकाणी पर्जन्य मापक

मनपा बसविणार सहा ठिकाणी पर्जन्य मापक

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरात (nashik city) पडणार्‍या पावसाची नोंद (Rainfall record) स्वतः महापालिका (Municipal Corporation) घेणार आहे. पाऊस मोजमाप करण्याची यंत्रणा (Rain gauge) मनपाकडे नव्हती.

- Advertisement -

राज्य शासनाच्या (state government) सिंचन विभागाकडून (Department of Irrigation) ती माहिती महापालिकेला मिळायची, मात्र माहिती नियमित मिळत नसल्याने विविध प्रकारच्या कामांमध्ये अडचणी येत असल्यामुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार (Municipal Commissioner and Administrator Ramesh Pawar) यांनी शहरातील सहाही विभागांमध्ये पर्जन्य मोजमाप यंत्रणा (रेन गेज) लावण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक महापालिका (Nashik Municipal Corporation) हद्दीत पावसाळ्यात समस्या उद्भवल्यास त्यावर प्रतिबंधासाठी महापालिका स्वत:ची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक भक्कम करणार आहे. त्यासाठी महापालिका शहरातील पाऊस मोजण्यासाठी सहाही विभागातील अग्निशमन दलाच्या कार्यालयावर पाऊस मोजण्यासाठी रेन गेज मशीन बसविणार आहे. महापालिका आयुक्तांनी आज आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक घेतली. त्यात आपत्ती व्यवस्थापन विषयक त्रुटी दूर करण्यासाठी शहरातील पावसाचे मोजदाद, विसर्गाची माहिती घेणे यासह जलसंपदा विभागाच्या संपर्कात राहून आपत्ती व्यवस्थापन उपाययोजना बळकट करण्याच्या सुचना दिल्या.

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जसा पाऊस मोजला जातो. त्याप्रमाणे शहरातील प्रत्येक विभागातील पावसाची माहिती अद्यावत स्वरुपात मिळण्यासाठी स्वयंचलित रेन गेज बसविले जातील.त्यात पाऊस मोजण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्याची गरज असणार नाही. स्वयंचलित पध्दतीने त्याची संगणकावर रोजच्या रोज नोंद होईल अशी यंत्र बसविली जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेने जलसंपदा विभागाला पत्र देऊन धरणातून सोडण्यात येणार्‍या पूराच्या पाण्याची माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे धरणातील पाणी सुटल्यानंतर शहरात नदी काठी राहणार्‍या लोकांच्या स्थलांतरापासून तर त्यांचे तात्पुरते पुनर्वसन करणे महापालिकेच्या यंत्रणेला शक्य होणार आहे.

सेवकांना मिळणार गणवेश

नैसर्गिक आपत्ती किंवा पूरस्थितीत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कर्मचार्‍यांना रस्त्यावर काम करावे लागते. मात्र गर्दीत त्यांना अडचणी येतात. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांना स्वताचा गणवेश असल्याने ते त्वरीत लक्षात येतात. पण इतर कर्मचारी लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांना काम करण्यात अडथळे येतात. ते टाळण्यासाठी स्वतंत्र ड्रेस कोड असावा अशाही सुचना महापालिका आयुक्तांनी मांडल्या.

विभागीय अधिकार्‍यांना सतर्कतेचे आदेश

नाशिक महापालिका हद्दीत आपत्ती व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे, या दृष्टीने महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी कडक भूमिका घेतली आहे. शिक शहरात होणार्‍या पावसाची माहिती सिंचन विभागाकडून महापालिकेला वेळोवेळी मिळत राहावी, तसेच शहरातील सर्व सहा विभागातील विभागीय अधिकार्‍यांनी पावसाळ्यात फिल्डवरहावे, असे आदेश आज आयुक्त पवार यांनी दिले.

पावसाळा सुरू झाला असून नाशिक मध्ये दोन वेळा जोरदार पावसाची हजेरी देखील झाली आहे. या काळात नेहरूचौक, दहीपुल या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.यानंतर महापालिका आयुक्तांनी महापालिका प्रशासनाला पावसाळ्यात अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. आज झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी सर्व विभागीय अधिकार्‍यांना सूचना करताना पावसाळ्यात आपण सर्वांनी आपापल्या विभागात फिल्डवर रहावे, लोकांशी संपर्कात राहावे, सर्व प्रकारच्या सूचना तसेच जनजागृतीची कामे देखील सतत करण्यात यावी आदी सूचना केल्या.

सिंचन विभागाला पत्र देणार

नाशिक शहरात विविध ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रणा सिंचन विभागाच्या वतीने लावण्यात आली आहे. यामुळे शहरात कोणत्या भागात किती पाऊस पडला, किती मिलिमीटर पाऊस झाला याचा अंदाज येतो. मात्र ही माहिती नाशिक महापालिका प्रशासनाला मिळत नाही. यामुळे महापालिका प्रशासन आता सिंचन विभागाला पत्र देऊन पाऊस बाबतची सर्व प्रकारची माहिती सतत अपडेट करण्याची मागणी करणार आहे. त्याचप्रमाणे धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्याच्या देखील सूचना महापालिकेपर्यंत पोहोचण्यात याव्यात, जेणेकरून किती पाणी सोडण्यात येणार आहे व कधी सोडण्यात येणार आहे, याबाबतची माहिती देखील महापालिकेला मिळावी असे देखील पत्रात नमूद करण्यात येणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sharad Pawar : “कुणाशीही संबंध ठेवा, पण भाजपशी…”; राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर शरद...

0
मुंबई | Mumbai राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. तसेच राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे...