पिंपळगाव बसवंत । प्रतिनिधी Pimpalgaon Basvant
- Advertisement -
आज (२० मे) रोजी पिंपळगाव शहरात संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली.
सायंकाळी झालेल्या पावसाच्या तडाख्यात जोपूळ रोडवरील बाजारसमितीत असलेल्या अनेक व्यापाऱ्यांच्या शेडचे प्रचंड नुकसान झाले असून बाजारसमितीच्या लगत असलेल्या एका कांदा शेडसह पॉलिहाऊसचे मोठे नुकसान झाल्याने व्यापारी शेतकरी यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.
पावसाच्या तडाख्यात जोपूळ रोडवरील बाजार समिती कमाणीचे नुकसान झाले आहे.