Tuesday, April 29, 2025
Homeधुळेधुळे-साक्री तालुक्याला पावसाने झोडपले

धुळे-साक्री तालुक्याला पावसाने झोडपले

धुळे/निजामपूर ।dhule प्रतिनिधी

धुळे शहरासह (city of Dhule) परिसराला सायंकाळी पावसाने अक्षरश: झोडपून (Literally pouring rain) काढले. साक्री तालुक्यातील निजामपूर, खुडाणे, डोमकाणी या भागात जोरदार गारा (Heavy hail fell) पडल्यात तर भामेरला वीज पडून दोन बैल ठार (Two bulls killed) झाले आहेत.

- Advertisement -

धुळे-दादर रेल्वेचा शनिवारपासून शुभारंभ

अवकाळी पावसाचा तडाखा सुरुच असून आज पुन्हा एका धुळे व साक्री तालुक्यातील अनेक गावांना पावसाने झोडपले. धुळे शहरात सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. दुपारनंतर ढग दाटून आले आणि साधारणता 3 वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. ढगांचा गडगडाट आणि जोरदार वीजा कडाडू लागल्याने नागरीकांनी सुरक्षितेसाठी मिळेल त्या जागांचा आधार घेतला.

पावसाचा जोर वाढल्याने नेहमीप्रमाणे अनेक गल्ल्यांमध्ये पाणी तुंबून वाहने अडकून पडलीत. वादळी वार्‍यामुळे सायंकाळपासून अर्ध्याहून अधिक धुळे शहरात वीजपुरवठा खंडीत झाला. रात्री 9.30 पर्यंतही वीज प्रवाह पुर्ववत सुरु झालेला नव्हता. या पावसामुळे बाजारपेठेतही व्यावसायिकांची तारांबळ उडाली.

रखरखत्या उन्हात वाघुर नदीला…. अवकाळी पुर !घर मालकाचा खून करणार्‍या भाडेकरू मुलास जन्मठेप

गारांचा मारा

साक्री व परिसरात दुपारी 2 वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. मात्र निजामपूर, खुडाणे, डोमकाणी या परिसरात जोरदार गारांचा वर्षाव झाला. वादळीवार्‍यामुळे अनेकांचे नुकसानही झाली. मुसळधार पावसाने गावात गल्ल्यांमधून अक्षरशा पाट वाहू लागलेत.

याच परिसरातील भामेरला वीज पडून लक्ष्मण मोतीराम सोनवणे या शेतकर्‍याचे दोन बैल जागीच ठार झाले. जोरदार पावसामुळे शेतकरी, शेतमजूरांचे हाल झालेत. तर या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतीची मोठे नुकसान केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांना आता खाकी गणवेश

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास मान्यता देण्यात आली आहे. या गणवेशात टोपी निळ्या रंगाची असून त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाची...