मुंबई | Mumbai
राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सोमवारी सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस (Mumbai Rain) कोसळत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले असून रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. पहाटेपासूनच पावसाची जोरदार बॅटींग सुरु असल्याने मुंबई ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या युवासेनेचे अध्यक्ष आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की “मुंबई महापालिकेवर गेल्या तीन वर्षांपासून भाजपचे नियंत्रण असूनही, शहरातील पायाभूत सुविधा ढासळल्या आहेत. भाजप सरकारच्या कमालीच्या बेफिकीरीमुळे आज मुंबई थांबली. ज्याठिकाणी पूर्वी कधीच पाणी साचत नव्हते, अशा भागांत आज पाणी साचले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपच्या सगळ्यात वाईट कामाचे हे प्रतिबिंब असल्याचे आदित्य यांनी म्हटले.
This is immensely painful to see. This area was made water logging free by us 4 years ago. Today, because the bjp controlled @mybmc did not initiate the SoPs for the monsoons, it is water logged again. https://t.co/YQ24PbMvU4
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 26, 2025
पुढे ते म्हणाले की,” २०२१-२२ मध्ये आमच्या कार्यकाळात पाणी साचत असलेल्या हिंदमाता परिसरातून ही समस्या दूर केली होती. आता, मात्र पुन्हा एकदा पाणी साचले. याचे मुख्य कारण म्हणजे महापालिकेने वेळेवर पाणी उपासण्याची प्रक्रिया सुरू केली नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच याआधी मागील आठवड्यात अंधेरी सबवे आणि साकीनाका मध्ये पाणी साचले होते. त्यानंतर आजच्या पावसात अनेक भागांमध्ये पाणी साचले असल्याचे दिसून आले”, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
भाजपला मुंबईबद्दल राग का?
गेल्या आठवड्यात अंधेरी सबवे आणि साकीनाका परिसरात पाणी साचल्याचे दिसून आले. आता मात्र अशा अनेक भागांमध्ये हीच स्थिती पाहायला मिळत असून, भाजपाच्या निष्क्रियतेचा थेट फटका सामान्य मुंबईकरांना बसत आहे.त्यामुळे “मुंबईचा एवढा द्वेष भाजपला का आहे?” असा थेट सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच शहरातील अर्धवट रस्त्यांचे काम आणि नालेसफाई पूर्ण न झाल्यामुळेच आज यापूर्वी कधीही पाणी न साचलेल्या ठिकाणी सुद्धा पाणी तुंबत आहे. भाजपच्या उदासीनतेचा मुंबईला मोठा फटका बसला आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.