Saturday, July 27, 2024
Homeनगरपाऊस थांबल्याने विसर्ग घटविले

पाऊस थांबल्याने विसर्ग घटविले

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

धरणाच्या पाणलोटात काल दिवसभर ऊन पडले होते. पाऊसाने ब्रेक घेतला. पाण्याची आवक मंदावल्याने गंगापूरचा विसर्ग रविवारी सकाळी बंद करण्यात आला. दारणाचा विसर्गही घटवून तो 1100 क्युसेक वर आणण्यात आला. तर नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातुन सोडला जाणारा गोदावरीतील विसर्ग कमी करत तो 4117 क्युसेक वर आणण्यात आला. दरम्यान जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातुन तीन दिवसात अडीच टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 1 जून पासुन गोदावरीत साडेआठ टिएमसी पाण्याचा विसर्ग काल सकाळ पर्यंत करण्यात आला.

- Advertisement -

काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासात दारणाच्या भिंतीजवळ 20 मिमी पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावरील पाणी दारणात दाखल होणे सुरु आहे. काल सकाळी मागील 24 तासात दारणात 271 दलघफू नविन पाणी दाखल झाले. या धरणाचे पाणी पंधरा दिवसांपासुन पिण्याच्या पाण्यासाठी तसेच सिंचनासाठी सोडले आहे. त्यामुळे दारणा 87 टक्क्यांवर आले होते. पावसाने या धरणाचा साठा वाढला व विसर्ग करुनही 97.10 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे.7149 दलघफू क्षमतेच्या या धरणात 6942 दलघफू पाणी साठा आहे. दारणातुन काल सकाळ पर्यंत एकूण 6335 दलघफू पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. म्हणजेच सव्वा सहा टिएमसी हुन अधिक पाणी या याधरणातुन नांदूरमधमेश्वर बंधार्‍याकडे धावले आहे. या धरणाच्या समुहातील भाम, भवली वालदेवी ही धरणे 100 टक्के भरली आहेत. मुकणे 84.92 टक्के भरले आहे. भाम मधुन 2170 क्युसेक ने विसर्ग सुरु आहे.

गंगापूर धरणाचा साठा 95.08 टक्के इतका आहे. या धरणात काल सकाळी मागील 24 तासात 234 दलघफू नविन पाणी दाखल झाले. तीन दिवसांपुर्वी या धरणाचा साठा 91 टक्क्यांवर स्थिर होता. पावसानंतर तो 95.08 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे. या धरणाच्या समुहातील गौतमी गोदावरी मध्ये 77.73 टक्के पाणी साठा आहे. कश्यपीत 80.35 टक्के पाणी साठा आहे. कडवात 91.71 टक्के, आळंदी 100 टक्के, भोजापूर 100 टक्के भरले आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये सरासरी 90.02 टक्के पाणी साठा आहे. मागील वर्षी तो 97.51 टक्के कालच्या तारखेला होता. नाशिकच्या सर्व 22 धरणांंमध्ये एकूण 45.44 टिएमसी पाणी आहे.

तर मागील वर्षी ते 49.22 टिएमसी होते. गोदावरीच्या दोन्हीही कालव्यांच्या लाभक्षेत्रातील कोपरगाव व राहाता तालुक्यात पावसाचा प्रमाण नगण्य आहे. पाऊस मुसळधार होईल, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा होती. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे तीही फोल ठरली. बुरबूर स्वरुपाच्या पावसाने पिकांना काही अंशी जिवदान मिळाले असले तरी मात्र दुष्काळाचे सावट कायम आहे. या हंगामात मुसळधार पाऊस न झाल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गोदावरीचा ओव्हरफ्लो या शेतकर्‍यांना पाणी टंचाईच्या संकटाला वाचवू शकतो. जेथे जेथे शक्य असेल तेथे तळे, बंधारे भरण्याची गरज आहे, असे गणेशच ेसंचालक अ‍ॅड. नारायण कार्ले यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या