मुंबई | Mumbai
देशभरात आतुरतेने वाट पाहिला जाणाऱ्या मोसमी पावसाने (Monsoon Update) यंदा वेळेआधीच केरळमध्ये (Keral) दाखल होऊन एक सुखद धक्का दिला होता. भारतीय हवामान विभागाने (IMD) काल मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली. यंदा मोसमी पावसाने सरासरी वेळेपेक्षा केरळमध्ये तब्बल ८ दिवस आधीच हजेरी लावली आहे. यापूर्वी २००९ मध्ये मोसमी पाऊस केरळात २३ मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर १६ वर्षांनी मोसमी पाऊस इतक्या लवकर केरळात दाखल झाला होता.
दरम्यान, केरळबरोबरच तामिळनाडूचा (Tamil Nādu) बहुतांश भाग व्यापून कर्नाटकाच्या (Karnatka) काही भागापर्यंत मोसमी पावसाने शनिवारी मजल मारली होती. त्यानंतर गोव्याच्या वेशीवरही मोसमी पाऊस दाखल झाला होता. त्यामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर राज्यातही तब्बल १२ दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे.
Update on Further advance of Southwest Monsoon today, the 25th May, 2025
❖The Southwest Monsoon has further advanced into some more parts of westcentral & eastcentral Arabian Sea, some more parts of Karnataka, entire Goa, some parts of Maharashtra, some more parts of…
— India Meteorological Department (@Indiametdept) May 25, 2025
वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाल्याने शेतकऱ्यांना (Farmer) मोठा दिलासा मिळाला असून, आनंदाचे वातावरण आहे. तसेच दरवर्षी मान्सून साधारणपणे ७ जूनच्या आसपास राज्यात दाखल होतो. मात्र, यंदा मान्सून १२ दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सूनची एकूण आगेकूच पाहता पुढील काही तासांमध्ये मान्सून मुंबई आणि पुण्यात दाखल होईल, असा अंदाज आहे. आज सकाळपासून मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान, हवामान खात्याने मुंबई आणि ठाण्याला (Mumbai and Thane) रविवारी यलो अलर्ट (Yeoll Alert) दिला आहे. तर रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून तळकोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. वादळी वाऱ्यामुळे तळकोकणात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी हे खरिपाच्या शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे मान्सूनच्या आगमानाने शेतकरी सुखावले आहेत.