येवला । प्रतिनिधी Yeola
शहरासह तालुका परिसरात आज दुपारी चार वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर नांदूर परिसरात गारांसह पाऊस झाला.
- Advertisement -
गेल्या दोन- तीन दिवसांपासून शहरासह तालुक्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. आज, सकाळ पासून वातावरणात मोठा उष्मा निर्माण झाला होता. अचानक झालेल्या अवकाळी पावसाने ग्रामीण भागात शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली.
अवकाळी पावसाच्या हजेरीने कांद्यासह इतरही पिकांना फटका बसणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे. शहरात सकाळ पासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने वाढत्या उष्म्याने ज्येष्ठांसह लहान बालके हैराण झाली.