Friday, December 13, 2024
HomeनाशिकRain News : नाशिकसह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची हजेरी

Rain News : नाशिकसह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची हजेरी

नाशिक | Nashik

मान्सून (Monsoon) उंबरठ्यावर आलेला असताना पूर्वमोसमी पावसाने गुरुवार (दि.६) रोजी जिल्ह्यातील विविध भागांत हजेरी लावली आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता. त्यामुळे नागरिक अक्षरशा घामाघूम झाल्याचे पाहायला मिळत होते. त्यानंतर सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास पावसाने (Rain) नाशिकरोडसह शहरातील विविध भागांत हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.

- Advertisement -

नाशिकसह जिल्ह्यातील विविध भागांत आज दुपारपर्यंत कडक ऊन (Heat) होते. त्यानंतर ऊन कमी होऊन सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले. यानंतर शहरातील नाशिकरोडसह आदी परिसरात ढगांच्या गडगडाटासह पावसाने (Rain) हजेरी लावली.

तसेच सिन्नर तालुक्यात (Sinnar Taluka) देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे गाडी चालवतांना चालकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. तर सिन्नर एमआयडीसी (Sinnar MIDC) परिसरात ट्रक आणि बसचा अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या