Saturday, July 27, 2024
Homeनाशिकभात शेती बळीराजाला तारणार

भात शेती बळीराजाला तारणार

ओझे । Oze

दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाचे प्रमाण भात शेतीसाठी फायदेशीर होत असल्यामुळे या पिकावरील शेतकरी वर्गाची आशा पल्लवित झाल्या आहेत.

- Advertisement -

सध्या तालुक्यात पावसाचे प्रमाण हे कधी कमी तर संततधार या स्थितीचा आहे. त्यामुळे या पावसाचा फायदा भात पिकांला योग्य होईल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.

भात पिकांसाठी अशा स्वरूपाचा पाऊस असल्यास त्याचा परिणाम उत्पन्न वाढीसाठी चांगला होत असतो.परंतु संततधार पाऊस काही पिकांसाठी धोक्याची घंटा असते. त्यामुळे भात पिकविणारा शेतकरी व टमाटा पिकविणारा शेतकरी वर्ग यामध्ये या पावसाने तफावत पडत असते.

दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जास्त प्रमाणात भात पिकांची जास्त पसंती असते. त्यामध्ये बराच शेतकरी वर्ग भाताच्या विविध प्रकारचे बियाणे खरेदी करून लागवड करीत असतो. त्यात दप्तरी, भोगवती, लालकोर, महालक्ष्मी, कोळपी आदी स्वरुपाची बियाणे खरेदी करून लागवड करीत असतो. परंतु यंदा दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्याला भाताची नगरी म्हणून ओळखले जाते.

यंदा या भागातील शेतकरी वर्गाने इंद्रायणी भाताला जास्त पसंती दिली आहे. हा भाग भात शेती साठी योग्य मानला जातो. याभागातील शेतकरी वर्गाने भात शेतीसाठी कुंडी वाफा, दलदल, वाफा, जमीन पायरी,टप्प्यात वाफा पध्दतीने भात शेती लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.त्यासाठी संततधार पावसाची खुप गरज असते. परंतु सध्या दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात अशा स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे भात पिकांला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे यंदा शेतकरी वर्गाने आपल्या शेतामध्ये इंद्रायणी भाताची रोपे निर्माण करून मोठ्या प्रमाणावर लागवड केली.

यंदाच्या हंगामात व मागील हंगामात सर्व पिकांनी आम्हाला साथ दिली नाही. त्यामुळे आमचा भांडवलाचा खर्च सुध्दा निघाला नाही. परंतु मागील काही दिवसात भात पिकांला योग्य पाऊस झाल्याने भात पिकांला सुगीचे दिवस येतील असे वातावरण निर्माण झाले आहे.

– सुनिल महादु ढाकणे, भात उत्पादक, ओझे

- Advertisment -

ताज्या बातम्या