Friday, December 13, 2024
Homeनाशिक‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची जनजागृती करा

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची जनजागृती करा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना संसर्गाला अटकाव घालण्यासाठी राज्य सरकारने माझी कुटूंब माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेतली आहे.

- Advertisement -

या मोहिमेला घराघरात पोहचविण्यासाठी जिल्हाप्रशासनाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये दर्शनी भागावर या मोहीमेचा लोगो व माहिती देणारा फलक लावावा, असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सर्व विभागांना दिले आहे.

महाराष्ट्रात करोनाला संसर्ग रोखण्यासाठी सर्व यंत्रणा रात्रंदिवस झटत आहे. राज्यात दिवसाला दररोज 20 हजार नवे पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहे. आरोग्य विभागाने अ‍ॅण्टिजेन टेस्टचे प्रमाण वाढवले आहे. करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेतली आहे.

या मोहीमेत प्रत्येक कुटूंबाला सहभागी करण्याचे नियोजन आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची मुख्य जबाबदारी जिल्हा प्रशासनावर सोपविण्यात आली आहे. त्यानूसार जिल्हा प्रशासन कामाला लागले असून या मोहीमेची जिल्हास्तरावर व्यापक जनजागृती केली जाणार आहे.

शासकीय कार्यालयांमध्ये रोज कामकाजानिमित्त शेकडो नागरिक येत असतात. ते बघता जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, तहसिल, प्रांत, तलाठी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, उप निबंधक कार्यालय यांसह सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात दर्शनी भागावर ’माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या मोहीमेचा लोगो लावून माहिती द्यावी अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या