Friday, July 12, 2024
Homeदेश विदेशराज कुंद्रा अश्‍लील फिल्म प्रकरण : अभिनेत्री शर्लिन चोप्राला समन्स

राज कुंद्रा अश्‍लील फिल्म प्रकरण : अभिनेत्री शर्लिन चोप्राला समन्स

मुंबई / Mumbai – बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्राला अश्‍लील फिल्म्स तयार करणे आणि त्या अ‍ॅपच्या सहाय्याने रिलीज (प्रदर्शित) करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दरम्यान,

- Advertisement -

या प्रकरणात आता अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिला गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आले आहेत. प्रॉपर्टी सेलमध्ये चौकशीसाठी हे समन्स बजावण्यात आले आहेत. राज कुंद्रा अश्‍लील चित्रपट प्रकरणात शर्लिन चोप्राची चौकशी करण्यात येणार आहे. या आधीही सादर प्रकरणात शर्लिन चोप्रा हिचे नाव समोर आले होते.

राज कुंद्रा कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. कोर्टाने त्यांना 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

महाराष्ट्र सायबरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांची नावे आरोपी म्हणून आली आहेत. त्यांचा जबाब महाराष्ट्र सायबरने नोंदवला आहे. या दोन्ही अभिनेत्रींनी कुंद्रावर आरोप केले होते. राज कुंद्रा यांना गेल्या वर्षी कोर्टाकडून अंतरिम जामीन मिळाला होता आणि जामीन अर्जावर अंतिम सुनावणी या महिन्याच्या शेवटी होणार होती.

दरम्यान, शर्लिन चोप्राचा राज कुंद्राच्या फर्म आर्म्सप्राइम मीडियाबरोबर करार होता. हा करार भारताबाहेर कंपन्यांच्या काही अ‍ॅप्ससाठी अश्‍लील सामग्री पुरवण्याचा होता. तिचे माजी वकील चरणजित चंद्रपाल यांच्या म्हणण्यानुसार शर्लिन तिचा अ‍ॅप सेमी पॉर्न पद्धतीने चालवत असे. तिचे हे पार्टटाईम काम फार चांगले चालले नव्हते आणि काही काळानंतर शार्लिनला कुंद्राने स्पॉट केले. राज कुंद्राने शर्लिन चोप्राला सांगितले की, तिला या बदल्यात 50% नफा मिळेल. राज यांनी स्वत: या करारावर सही केली होती.

यातून तिने जून 2019 ते जुलै 2020 दरम्यान चांगली कमाई केली होती. मात्र, शर्लिनला समजले की तिला या करारानुसार पैसे मिळत नाहीयत आणि म्हणूनच वर्षभरानंतर तिने हा करार संपुष्टात आणण्यास सांगितले. शर्लिनने पुन्हा तिचे स्वतःचे अ‍ॅप बनवले आणि काही महिन्यांपर्यंत हे काम केले. परंतु 2020 च्या ऑगस्टमध्ये तिच्या कंटेंटची पायरसी होत होती आणि तिने स्वत: याबद्दल तक्रार दिली होती. 2021 फेब्रुवारीनंतर तिने राज कुंद्राने तिला या इंडस्ट्रीमध्ये कसे ढकलले याबद्दल सांगितले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या