Thursday, May 23, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील राजकीय वातावरण...; राज ठाकरेंकडून खंत व्यक्त

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण…; राज ठाकरेंकडून खंत व्यक्त

ठाणे | Thane

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गढूळ झाले आहे. त्यामुळे साहित्यिक, कवी यांनी याबाबत बोलायला हवे. कवींनी याबाबत बोलायला सुरुवात केली तर त्यांचेही महत्व वाढेल. असलेल्या परिस्थितीवर भाष्य करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, आजची देशाची आणि महाराष्ट्राची परिस्थिती पाहता मी राजकारणी म्हणवत नसल्याचे राज ठाकरे (Raj Thackery) म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या असंग्रहित कथा, कवितांचे प्रकाशन करण्यात आले. ठाणे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज ठाकरे यांनी यावेळी कुसुमाग्रजांचे कौतुक केले. महाराष्ट्रात अनेक मोठ्या लोकांचा जन्म झाला आहे. पण, आपल्याच लोकांना आपण मोठं करत नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Maratha Andolan : पांगरीतील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

मी इंग्लंडला गेल्यावर शेक्सपिअरचे घर पाहिले. ते जपून ठेवण्यात आले होते. आमची माणसे किती मोठी होती. ती किती मोठी होऊन गेली हे सतत दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तो आपला नसतो. आपल्याकडे संमेलन भरतात. लोक येऊन बोलतात. पण, पुढे काही होत नाही, असे ही ते म्हणाले.

दरम्यान राज ठाकरे यांनी यावेळी कुसुमाग्रज यांची कविता वाचली. त्यांची कविता राजकारणाला समजले नाही, ती निदान जनतेला तरी समजली पाहिजे. आपण कोणाला बोलून घेतो कोण माणसे त्यांची काय लायकी आहे, असा टोला त्यांनी राजकीय नेत्यांना लगावला.

भारताच्या झटक्यानंतर कॅनडाची नरमाईची भुमिका; भारतविरोधी बॅनर्स आणि पोस्टर्स हटवण्याचे आदेश

किशोरी आमोणकर यांचे पुस्तके प्रकाशन माझ्या हस्ते करण्यात येत होते. मी आमोणकरांना म्हटले तुम्ही चुकीच्या माणसाला बोलावताय. विचार करा की आमोणकरांचे पुस्तक माझ्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. आम्ही चुकीच्या जागी जांभळासारखे जाऊन टपकतो, असे राज ठाकरे म्हणाले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या