Friday, March 28, 2025
Homeमनोरंजन'...असा हा एकमेवाद्वितीय सुपरस्टार'; राज ठाकरेंकडून रजनीकांत यांचं अभिनंदन

‘…असा हा एकमेवाद्वितीय सुपरस्टार’; राज ठाकरेंकडून रजनीकांत यांचं अभिनंदन

मुंबई | Mumbai

जेष्ठ अभिनेते व सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची घोषणा आज केली.

- Advertisement -

त्यानंतर, जगभरातून रजनीकांत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील रजनीकांत यांचं अभिनंदन केलं आहे.

राज ठाकरे यांनी म्हंटल आहे की, “रजनीकांतना काहीच अशक्य नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच, पण अशा आशयाचे हलकेफुलके विनोद त्यांचे सिनेमे फारसे न पाहिलेला पण हिरहिरीने एकमेकांना पाठवतो. ज्या अभिनेत्याचं देऊळ उभारलं जाऊन, रजनीकांत ह्या व्यक्तीला जवळपास देवाच्या जवळ नेऊन त्यांचा एक पंथ निर्माण होतो, आणि इतकं असताना हाच अभिनेता अपूर्व प्रसिद्धीच्या झोतात देखील सिनेमातील पात्राची झूल उतरवून सामान्य माणसासारखा जगू शकतो असा हा एकमेवाद्वितीय सुपरस्टार. रजनीकांत ह्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या हा अभिनेत्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन.”

रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. १२ डिसेंबर १९५० रोजी बेंगळुरुतील एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांचा प्रवास अद्भूत आहे. रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीतील सर्वात पहिला ब्रेक १९७५ मध्ये वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी मिळाला. हा चित्रपट होता ‘अपूर्व रागंगल’. कमल हसन यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात रजनीकांत यांना केवळ १५ मिनीटांची भूमिका मिळाली होती. शाळेपासूनच रजनीकांत यांना अभिनयाची आवड होती. शाळेतील अनेक नाटकांमधून त्यांनी खलनायकाची भूमिका केली. रावणाची व्यक्तिरेखा साकारायला त्यांना फार आवडायचे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

सुपा उद्योगनगरी 5 वर्षांत वेगाने विस्तारणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सुपा-नगरसह जिल्ह्यातील उद्योग नगरींचा विकास आतापर्यंत पूर्ण क्षमेतेने होणे अपेक्षीत होते. त्यासाठी सर्वांनाच प्रयत्न वाढवावे लागतील. या भागात तंत्रज्ञान विकास आणि उद्योग...