पुणे । Pune
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवडच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर घणाघाती टीका केली. तसेच गुढीपाडव्याला मी दांडपट्टा फिरवणारा असं म्हणत हल्लाबोल केला आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला राज ठाकरेंच्या रडारवर कोण असणार याबाबत जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
राज ठाकरे म्हणाले, मला जे काही बोलायचं आहे ते मी गुढीपाडव्याला बोलणारच आहे. पण जातीपातीचे विषय, सोशल मीडियावर टाळकी भडाकवण्याचे उद्योग सध्या जाणूनबुजून सुरू आहेत. राजकारणाचा चिखल झाला आहे. एकमेकांची डोकी फोडत आहेत. हे लोकांना समजत नाही. सध्याचं राजकारण पाहिलं असता त्याला हंटरने फोडला असता. विषय भरकटवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी घडवल्या जात आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
जनतेची दिशाभूल करण्यासाठी जातीपातीचे विषय काढले जातायेत. सोशल मीडियातून तुमची टाळकी भडकवले जात आहेत. जाणूनबुजून हे उद्योग सुरू असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केलाय. यावेळी वांद्रे वरळी सी लिंक प्रकल्पावरूनही त्यांनी टोला मारला. प्रभू रामचंद्रांना जेव्हा वनवास झाला. प्रभू रामचंद्रांना हनुमान भेटले. लंकेत गेले. रावणाला मारलं. सीतामाईला घेऊन आयोध्येला आले. कुठे आयोध्या, दंडकारण्य, कुठे लंका प्रभू रामचंद्रांनी सेतू बांधला. हे हे सर्व १४ वर्षात घडलं. पण आजच्या काळात वांद्रे वरळी सी लिंकला १४ वर्षे लागली अशी फटकेबाजी राज ठाकरेंनी केली.
Devendra Fadnavis: औरंगजेबाची कबर पाडणार का? मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले…
मुंबई । Mumbai
मागील काही दिवसांपासून औरंगजेबाची (Aurangzeb) कबर ही राजकारणाच्या केंद्रस्थानी आलीये. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून काढून टाकावी अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करत काँग्रेसवर गंभीर आरोप केला. त्यांनी सांगितले की, ही कबर काँग्रेस सरकारच्या काळात जतन करण्यात आली आणि ती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या (ASI) संरक्षणाखाली आहे. त्यामुळे आता काँग्रेसची भूमिका स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, औरंगजेबाच्या कबरीला कायदेशीर संरक्षण आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. घाईघाईने कोणतेही पाऊल उचलता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे आमदार नितेश राणे यांनी ही कबर किती दिवस राहिल हे पाहा असे संकेत दिले आहेत.
दरम्यान यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी हल्लाबोल केलाय. औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारची वेळकाढूपणाची भूमिका सुरू आहे. तुम्ही राज्याचे नेतृत्व करता, तुम्ही ठरवलं तर काहीही करू शकतात. अनेक ठिकाणी तर पोलीस बळाचा वापर करून चुकीच्या गोष्टी सरकार घडवून आणते, तर या गोष्टी करणं काही अशक्य गोष्ट नाही. पण, सरकारचा वेळकाढूपणा सुरु आहे. दाखवायचे दात एक आणि खायचे दात एक आहे, असा म्हणत निलेश लंके यांनी राज्य सरकारला टोला लगावलाय.