Wednesday, October 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray : निवडणुक लढवणार, जिंकणार आणि सरकार बनवणार…; राज ठाकरेंचा निर्धार,...

Raj Thackeray : निवडणुक लढवणार, जिंकणार आणि सरकार बनवणार…; राज ठाकरेंचा निर्धार, टोलमाफीवर ही म्हणाले…

मुंबई | Mumbai
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. आचारसंहिता लागू होताच राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच मनसेच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढण्यावर मनसे ठाम आहे. निवडणुका लढवून जिंकण्याचा आणि सरकार बनवण्याचा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केल आहे. लवकरच राज्याचा दौरा आणि जाहीरनाम्याचंही प्रकाशन करणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे नेत्यांची बैठक पार पडली. अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अभिजीत पानसरे, शिरीष सावंत, अविनाश जाधव आणि राजू पाटील आदी नेते यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांवरुन महत्वाची घोषणा केली.

- Advertisement -

मी विधानसभा निवडणुका लढवणार आणि जोरात लढवणार आहे. माझ्या सभेत मी बोललो, सहज म्हणून नाही बोललो. सहकाऱ्यांचा उत्साह यावा यासाठी नाही बोललो. विधानसभा निवडणूका आम्ही जिंकू आणि सत्ता आणू. माझी भूमिका मी मांडली आहे, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच महयुतीच्या प्रस्तावावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी जर-तरवर चर्चा करत नाही. मी माझ्या सभेत बोललो ते बोललो आहे.

टोलमाफीची मागणी आमचीच
टोलमाफीसाठी आमचीच मागणी होती. खूप पूर्वीपासून आम्ही ही मागणी करत होतो. टोलमुळे आपली फसवणूक होते हा मुद्दाच आम्ही मांडला. टोलमाफी झाली यामुळे मी सरकारचे आभार मानतो. उशिरा का होईना त्यांना या गोष्टी समजल्या. मला काळजी फक्त एकाच गोष्टीची आहे, ती म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर टोल नाके बंद करायचे आणि निवडणुकीनंतर पुन्हा सुरु करायचे हे चालणार नाही. यापूर्वी अशा गोष्टी घडलेल्या आहेत. ही गोष्ट आता नको, नंतर सुरु केल्या. अनेकांनी शब्द दिला टोलनाके बंद करतो. सरकारने निर्णय घेतला त्याचे लोकांना समाधान आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

“टोलमाफी व्हावी ही आमचीच मागणी होती. काँग्रेसचे सरकार होते, तेव्हापासून आम्ही ही मागणी करत होतो. आपली फसवणूक होत आहे, हे लोकांना वाटत होते. या निर्णयाबद्दल मी सरकारचे आभार मानेन. अनेकांनी टोल नाके बंद करू म्हणून शब्द दिले. मात्र निवडणूकीच्या तोंडावर हे झालेले आहे. मत पाहिजे म्हणून टोल बंद केले, असे होणार नाही असे होऊ देणार नाही. राज ठाकरेंनी एखादे आंदोलन पुढे नेले की असेच होणार आहे. आता सगळे श्रेय लाटायला येतील,” असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या