Sunday, April 27, 2025
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray On RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राज ठाकरेंची...

Raj Thackeray On RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राज ठाकरेंची स्पेशल पोस्ट; ९९ वर्ष संघाने निःसंशय…

मुंबई | Mumbai
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आज ९९ वर्ष पूर्ण झाले असून या संघटनेने १००व्या वर्षात पदार्पण केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आजपासून सुरु होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्धापनदिन आहे. ९९ वर्ष पूर्ण करत या संघटनेने शंभरीत पदार्पण केलं आहे. याबद्दल प्रत्येक संघ स्वयंसेवकाचे मनापासून अभिनंदन करतो. भारताला आपली मातृभूमी मानणारे सगळे हिंदू आहेत आणि या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे उद्दिष्ट घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व याचा अभिमान समाजामध्ये व्हावा यासाठी गेली ९९ वर्ष संघाने निःसंशय मोठे काम केले आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

पुढे बोलताना, संघाचे काम मला कायमच अचंबित करते. देशात कोणीतही नैसर्गिक आपत्ती आली तर तिथे तात्काळ धावून जाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अग्रेसर असतो, हे मी अनेकदा पाहिले आहे. संघातील बर्‍याच स्वयंसेवक व प्रचारकांशी माझा संवाद आहे. देशाच्या दुर्गम भागांमध्ये जाऊन काम करणे, तिथे भारतीयत्वाची, राष्ट्रीयत्वाची भावना रुजवणे, यांसाठी त्यांना किती संघर्ष करावा लागतो याचा तपशील मला माहित आहे, अशी प्रतिक्रियाही राज ठाकरे यांनी दिली.

एका विचाराला घट्ट धरून ठेवत, एखाद्या संघटनेने १०० वर्ष काम करावे हे सोपे नाही. जगाच्या इतिहासात एखादी संघटना १०० वर्ष टिकली असेल आणि तरीही तिचा विस्तार सुरु असेल आणि ती कार्यशील असेल, असे वाटत नाही. ही संघटना कायम जागृत ठेवणाऱ्या सर्व संघ स्वयंसेवकांना माझ्या अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. तसेच हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व रुजवण्यासाठी धडपडणारा प्रत्येक घटक, विचार हा असाच तेवत राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असेही ते म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ladki Bahin Yojana : “लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देऊ…”; मंत्री...

0
मुंबई | Mumbai लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महायुतीला (Mahayuti) बसलेल्या झटक्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने लागू केली. या...