मुंबई | Mumbai
राज्यातील विधान सभा निवडणुका जस जशा जवळ येत आहे तस तसे राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहे. जागा वाटप, आरोप प्रत्यारोप वरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच नेत्यांचे राजकीय दौरे ही वाढले आहे. अशातच राज्यातील प्रमुख पक्षापैकी एक असलेला मनसे पक्षाने देखील निवडणुकीसाठी कंबर कसली असून पक्ष प्रमुख राज ठाकरे हे पक्षाची मोर्चेबांधणी करत आहेत. त्यासाठी दुसऱ्यांदा विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेसाठी ‘मिशन विदर्भ’साठी रणनीती आखत आहेत. २७ आणि २८ सप्टेंबर रोजी दोन दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. २७ तारखेला पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्हाचा आढावा त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे. तर २८ तारखेला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, आणि चंद्रपूर जिल्हाचा आढावा घेतला जाईल.
सध्या राज्यातील राजकारणात विदर्भाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सत्तेचे गणित बसवण्यासाठी राजकीय पक्षांनी आपले लक्ष विदर्भाकडे केंद्रित केलेय. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील विदर्भातील आणि मराठवाड्यातील नेत्यांना मार्गदर्शन केले. विदर्भात आपण अमित शाह यांनी ४५ जागा जिंकू असा दावा अमित शहा यांनी केलाय. तर महाविकास आघाडीच विदर्भात ४५ जागा जिंकेल असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. त्यामुळे विदर्भाला वेटेज प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी ७ उमेदवार जाहीर केले आहेत. आता मनसे विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातून पहिली यादी राज ठाकरे जाहीर करण्याची शक्यता आहे. २७ तारखेला सकाळी ७.३० वाजता राज ठाकरे यांच अमरावतीत रेल्वे स्टेशनवर आगमन होताच मनसे कार्यकर्ते करणार जोरदार स्वागत करणार आहेत. यावेळीच राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातील नेत्यांची यादी जाहीर करतील असे बोलले जात आहे.
गेल्या वेळेस राज ठाकरे यांनी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि चंद्रपूर येथील उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामुळे विदर्भातील उर्वरीत जागांपैकी किती जागांवर उमेदवार जाहीर करता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा