Tuesday, June 25, 2024
Homeमुख्य बातम्यासुषमा अंधारेंच्या मेंदूला नारू झालाय काय?", प्रकाश महाजनांची शेलक्या भाषेत टीका

सुषमा अंधारेंच्या मेंदूला नारू झालाय काय?”, प्रकाश महाजनांची शेलक्या भाषेत टीका

पुणे(प्रतिनिधि)

- Advertisement -

सुषमा अंधारे काहीही बोलते. तिच्या मेंदूला काय नारू झालाय का? अशी टीका मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे. सुषमा अंधारे यांनी कालच्या मुलुंड येथील सभेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना महाजन यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली.

दरम्यान, सुषमा अंधारेंमुळे उद्धव ठाकरेंना लवकरच महिलांच्या बंडाला सामोरं जावं लागणार आहे, काल परवा मुसलमान झाल्यासारखं सुषमा अंधारे आदाब आदाब करत फिरतायत, असा हल्लाही त्यांनी चढवला. मातोश्री-2 कशी झाली ते सांगावं? उद्धव ठाकरेंना सवाल करावा, असंही ते म्हणाले. पुण्यामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जातीयवादी असल्याचा आरोप केला होता. राष्ट्रवादीच्या जन्मापासून राज्यात जातीयवादी राजकारण सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. सुषमा अंधारेंची सभा कालच झाली. या बाईला काय बोलावं? मी बीड जिल्ह्यातील आहे. तीही बीड जिल्ह्यातील आहे. तिला बोलायला ठेवलंय, भुंकायला नाही. मेंदूला नारू झाला की काय तिच्या. काय बोलली ती?असा सवाल प्रकाश महाजन यांनी केला.

कालच तिची सभा झाली. इतके वर्ष महापालिकेत सत्ता असून मातोश्रीचा मजला चढला नाही. पण कृष्णकुंजचा मजला चढला, असं ती म्हणाली. हे बोलण्याआधी तिने आपल्या मालकाला विचारायला हवं ना. मी असं बोलू की नको हे विचारलं पाहिजे ना? असा सवालही त्यांनी केला. राज ठाकरे यांना पुत्रमोह आडवा येतोय, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली होती. त्यावरही त्यांनी टीका केली. सुषमा अंधारेना पुत्रमोह होऊ शकत नाही, कारण त्यांची वेगळी अडचण आहे, असं महाजन म्हणाले. तुमचे नेते पहाटेच भाजपच्या पाणवठ्यावर गेले होते, त्यांनाच विचारा असा टोला त्यांनी रुपाली पाटलांना एका प्रश्नाला उत्तर देताना लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या