Saturday, May 4, 2024
Homeनाशिकराजापूरकर यांच्या नाणेसंग्रहाची नोंद गिनिज बुकमध्ये

राजापूरकर यांच्या नाणेसंग्रहाची नोंद गिनिज बुकमध्ये

नाशिक । प्रतिनिधी

राष्ट्रिय मुद्रा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांच्या प्राचीन नाणे संग्रहाची वर्ल्ड गिनिज बुक आॅफ रेकाॅर्ड व वंडर बुक वर्ल्ड रेकाॅर्ड लंडनमध्ये नोंद झाली आहे.

- Advertisement -

या रेकाॅर्डचे सर्टिफिकेट शुक्रवारी (दि.४) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते राजापूरकर यांना देऊन गौरविण्यात आले.

राजापूरकर यांचा दुर्मिळ नाणे अभ्यासण्याचा व त्याचा संग्रह करण्याचा छंद आहे. हा छंद जोपासताना त्यांनी या दुर्मिळ नाण्यांचे जतन करुन त्याचे संग्रालय तयार केले आहे. त्यात सहाशे ते हजार वर्षापुर्वीच्या दुर्मिळ नाणे आहेत.

या प्राचीन नाणी संग्रहाची नोंद वर्ल्ड गिनिज बुक आॅफ रेकाॅर्ड व वंडर बुक वर्ल्ड रेकाॅर्ड लंडनने घेतली आहे.

राजापूरकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रशस्तिपत्रक देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मांढरे यांच्या हस्ते राजापूरकर यांना हे प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या