Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रRajaram Factory Election Result : कंडका पडला! महादेवराव महाडिक विजयी; सतेज पाटलांना...

Rajaram Factory Election Result : कंडका पडला! महादेवराव महाडिक विजयी; सतेज पाटलांना मोठा दणका

कोल्हापूर | Kolhapur

मागील एक महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची धुमशान सुरू आहे. आज सकाळपासून कोल्हापूर येथील रमण मळा येथे या कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील मतमोजणीला सुरूवात झाली आहे…

- Advertisement -

मागील 28 वर्षांपासून महादेवराव महाडिक यांच्याकडे असलेल्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी सतेज पाटील यांनी यंदा कंडका पाडायचा अशा टॅगलाईनवर चंग बांधला होता.

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! फडणवीस-शिंदेंमध्ये पदाची अदलाबदली होणार?

या निवडणुकीत पाचव्या फेरी अखेर महाडिकांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. संस्था गटातून महादेवराव महाडिक यांनी 84 मते मिळवत आपला विजय निश्चित केला आहे. सतेज पाटील यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

विमानाला पक्षी धडकला, इंजिनला आग, प्रवाशांचा जीव टांगणीला; थरकाप उडविणारा Video Viral

तब्बल 700 मतांची आघाडी सत्ताधारी महाडिक गटाने घेतली आहे. ज्या भागातील मतमोजणी झाली आहे. तो महाडिक यांचा बालेकिल्ला समजला जातो. छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे. यामध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील गटात प्रचंड चुरस आहे. परंतु पहिल्या टप्प्यातील मतमोजणीनंतर महाडिक गटाने वर्चस्व मिळवल्याचे चित्र आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Barsu Refinery Protest : ”हा सर्वे थांबवा, नाहीतर…”; बारसू रिफायनरीबाबत शरद पवारांची उदय सामंतांशी चर्चा

तसेच संस्था गटातून महादेवराव महाडिक विजयी झाले आहेत. यामध्ये सतेज पाटलांना मोठा धक्का मानला जात आहे. महादेवराव महाडिक यांना 83 मते मिळाली आहेत. तर सचिन पाटील यांना 44 मते मिळाली असून एक मत बाद ठरले आहे.

IPL 2023 : मुंबई-गुजरातमध्ये आज चुरशीची लढत, कोण मारणार बाजी?

- Advertisment -

ताज्या बातम्या