Sunday, March 30, 2025
Homeब्रेकिंग न्यूजHaribhau Bagade : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले; थरारक...

Haribhau Bagade : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले; थरारक Video व्हायरल

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राजस्थानचे विद्यमान राज्यपाल (Rajasthan Governor) हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) हेलिकॉप्टर अपघातमधून थोडक्यात बचावले आहेत. राजस्थानमधील पाली येथे ही घटना (शनिवारी) घडली आहे. या अपघातातून राज्यपाल हरिभाऊ बागडे सुरक्षित बचावले असून त्यांना कुठलीही इजा झालेली नाही. त्यानंतर आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपाल हरिभाऊ बागडे हे राजस्थानमधील पाली (Pali) येथून हेलिकॉप्टरने उड्डान घेत असताना त्यातून अचानक धूर निघू लागला. ही बाब पायलटच्या लक्षात येताच त्याने हेलिकॉप्टर तत्काळ खाली उतरवले, त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेमुळे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या सुरक्षेतील (Security) मोठी चूक आढळून आल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरमधून धूर का निघू लागला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तसेच बागडेंची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपत्कालीन प्रोटोकॉल लागू केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, या घटनेमुळे राज्यपालांच्या सुरक्षेवर आणि हेलिकॉप्टरच्या (Helicopter) स्थितीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून डॉ. हेडगेवारांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन; नागपूरात...

0
नागपूर | Nagpur आज गुढीपाडव्याच्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते काही वेळापूर्वीच नागपूरात (Nagpur) दाखल झाले...