Friday, October 4, 2024
Homeराजकीयराजस्थान : मुख्यमंत्री गेहलोत आणि पायलट यांच्यातील भांडणात होणार तिसर्याचाच लाभ?

राजस्थान : मुख्यमंत्री गेहलोत आणि पायलट यांच्यातील भांडणात होणार तिसर्याचाच लाभ?

दिल्ली | Delhi

राजस्थानमधील राजकीय उलथापालथ संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहिती नुसार सचिन पायलट यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी – वाड्रा यांची भेट घेतली आहे. १४ ऑगस्टला राजस्थान विधानसभेचे सत्र सुरू होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. तसेच मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील भांडण मिटवण्यासाठी राजस्थानचा मुख्यमंत्री देखील बदलला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पदासाठी भंवर जितेंद्र सिंह यांचे नाव पुढे येऊ शकते.

- Advertisement -

तसेच एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याला सचिन पायलट यांच्या बद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सकारात्मक उत्तर दिले आहे. त्यांनी म्हंटले आहे की, ” आम्ही पाहिले देखील म्हणालो आहोत की, सचिन पायलट आणि त्यांच्या सोबतचे आमदार राजस्थानातील सरकार अस्थिर करण्याबाबत माफी मागितली तर त्यांना पुन्हा पक्षात परत घेण्याचा विचार केला जाऊ शकतो.”

- Advertisment -

ताज्या बातम्या