Saturday, May 4, 2024
Homeधुळेराजेंद्र बंबला आज न्यायालयात हजर करणार

राजेंद्र बंबला आज न्यायालयात हजर करणार

धुळे । Dhule । प्रतिनिधी

विमा एजंट (Insurance agent) तथा अवैध सावकार राजेंद्र बंब (Rajendra Bamb) याच्या पोलिस कोठडीची (Police cell) मुदत उद्या दि. 6 रोजी संपत असल्याने त्याला न्यायालयात (court) हजर करण्यात येणार आहे. तसेच त्याच्या पतसंस्थेतील लॉकरची तपासणी (Credit Union locker inspection) केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

- Advertisement -

अवैध सावकारीप्रकरणी (Illegal lending case) राजेंद्र बंब याच्यावर आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच तपास आर्थिक गुन्हे (Economic Crimes Branch) शाखेकडून केला जात आहे. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने तीन दिवसांच्या तपासणीत बंबच्या घरातून दोन बँकेच्या लॉकरमधून (bank locker) आतापर्यंत 15 कोटी 21 लाख 76 हजार 369 रूपयांचा मुद्येमाल जप्त केेला आहे. त्यात 8 कोटी 98 लाख 34 हजार 130 रूपयांची रोकड व 6 कोटी 23 लाख 42 हजार 389 रूपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे.

हा सर्व मुद्येमाल सुरक्षीत ठेवण्यात आला आहे. दरम्यान उद्या दि. 6 रोजी बंबच्या पोलिस कोठडीत मुदत संपत आहे. त्यामुळे त्याला न्यायालयात हजर केले जाईल. तसेच त्यांच्या योगेश्वर पतसंस्थेतील (Yogeshwar Patsanstha) लॉकरची तपासणी (Inspection of lockers) केली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या