Wednesday, May 29, 2024
Homeधुळेराजेंद्र बंब शहर पोलिसांच्या ताब्यात

राजेंद्र बंब शहर पोलिसांच्या ताब्यात

धुळे । Dhule । प्रतिनिधी

अवैध सावकार राजेंद्र बंबला (Illegal moneylender Rajendra Bamba) आज धुळे शहर पोलिसांनी ताब्यात (Dhule city police arrested) घेतले. त्याला उद्या न्यायालयात (court) हजर केले जाणार आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

जयेश दुसाणे यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र बंबवर पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. त्यानंतर बंबवर आझादगर पोलिसात आणखी दोन, शहर पोलिसात एक व देवपूर पोलिसात एक गुन्हा दाखल झाला.

आझादनगर पोलिसात दाखल तिसर्‍या गुन्ह्यात दोन दिवसांच्या पोलिस कस्टडीनंतर राजेंद बंब काल न्यायालयीन कोठडीत होता. आज शहर पोलिसात विलास ताकटे यांच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. उद्या दि. 25 रोजी दुपारी बंबला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या