Saturday, May 4, 2024
Homeनगरनिवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच विरोधकांनी केले आंदोलनाचे नाटक - राजेंद्र पवार

निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच विरोधकांनी केले आंदोलनाचे नाटक – राजेंद्र पवार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नगरपरिषदेसमोर काल विरोधकांनी जे आंदोलनाचे नाटक केले ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले आहे.

- Advertisement -

करोनाच्या काळात सर्वसामान्य जनतेला जेव्हा मदतीची गरज होती तेव्हा झोपेचे नाटक केलेले आज जागे झाले आहेत, अशी टीका सत्ताधारी नगरसेवक राजेंद्र पवार यांनी केली आहे.

शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर ताण पडत आहे. मात्र नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी मुख्याधिकारी, पाणीपुरवठा विभाग प्रमुख व कर्मचार्‍यांशी योग्य समन्वय साधून शहराला होणारा पाणीपुरवठ्याबाबत योग्य नियोजन केलेले आहे. पाणीपुरवठ्याबाबत सर्व परिस्थितीवर अनुराधाताई आदिक लक्ष ठेवून आहेत.

म्हणूनच नागरिकांना आरोग्याच्या समस्या जाणवल्या नाहीत. गेल्या 4 वर्षांत महावितरणकडून होणार्‍या विजपुरवठ्यात तांत्रीक अडचण आल्यास पाणीपुरवठ्यावर परिणाम होत होता. यासाठी नगराध्यक्षा आदिक यांनी एमएसईबीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेऊन विजेचा प्रश्न सोडविला. एक महिला सक्षमपणे काम करत आहे, आपली दुकानदारी बंद होणार आहे.

याची जाणिव झाल्यामुळेच नगरपरिषदेसमोर आंदोलनाचे नाटक करण्यात काही अल्पसंतुष्ट मंडळी धन्यता मानत आहेत. ज्यांचे प्रपंचच नगरपरिषदेवर अवलंबून होते ते दुःखी आत्मे एकत्र झालेले आहेत, अशी बोचरी टीका नगरसेवक पवार यांनी केली आहे.

नविन जलकुंभासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या प्रयत्नातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने निधी मंजूर केलेला आहे. त्या जलकुंभाच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे.

स्वत:च्या सत्तेच्या काळात ज्यांच्या घरात भांडे देखील बिसलेरीच्या पाण्याने घासली जात होती त्यांना पाण्याबाबत किती पुळका आहे हे शहरवासिय ओळखून आहेत. आपल्या हाती काही मुद्दा नाही त्यामुळे विरोधकांना धास्ती लागली आहे. असा टोला श्री. पवार यांनी लगावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या