Saturday, May 4, 2024
Homeनगरदेवळे उघडण्यासाठी केलेली आंदोलने साईंच्या विचाराने व श्रध्दा सबुरीने केली

देवळे उघडण्यासाठी केलेली आंदोलने साईंच्या विचाराने व श्रध्दा सबुरीने केली

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी मनसेच्यावतीने संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलने करण्यात आली होती.

- Advertisement -

राज्य शासनाने सर्व मंदिरे दिवाळी पाडव्याच्या दिवशी खुली करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने मनसेच्या आंदोलनाला यश आले असून जगप्रसिद्ध साईबाबांचे मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी खुले झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंनदोत्सव साजरा करण्यात आला असून सदरील आंदोलन साईंच्या विचार तसेच श्रद्धा व सबुरीने केले असल्याने यास यश मिळाले असल्याचे मनसेचे तालुका प्रमुख राजेश लुटे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

दि. 16 नोव्हेंबर रोजी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर साईमंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी मनसेच्यावतीने ढोल ताशा ,फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी राहाता तालुक्यातील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी नाशिक मनपाचे माजी महापौर अशोक मुर्तडक, नाशिकचे जिल्हाप्रमुख श्री.परदेशी, राहाता तालुका प्रमुख राजेश लुटे, उपतालुका प्रमुख गणेश जाधव, शिर्डी संघटक लक्ष्मण कोतकर, मनविसे जिल्हाध्यक्ष विजय मोगले, प्रशांत वाकचौरे संदीप लाळे, प्रशांत महाले, संजय सोनवणे,आदीत्य घोडेराव, कमलेश मनकाळे, अक्षय सोनवणे, आदित्य गाडेकर, गणेश गाडेकर, भाऊसाहेब सोनवणे, सौरव वहाडणे आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी तालुका प्रमुख राजेश लुटे यांनी सांगितले की साईमंदिर खुले करण्यासाठी राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शिर्डी येथे येऊन आंदोलन केले होते. सदर आंदोलन हे साईंच्या विचाराने श्रद्धा व सबुरीने केले होते. त्या आंदोलनाला आज यश आले आहे. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर साईंचे दर्शन घेण्यासाठी साईभक्तांना भाग्य प्राप्त झाले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या