सांगली | sangali –
एन-95 मास्क किंवा अन्य कोणतेही मास्क असो एका ठराविक किंमतीत ते विकले जावे असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. याबाबत 4 दिवसात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देखील आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात अद्यावत कोव्हिड रुग्णालयाचे उद्घाटन आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. Maharashtra health minister Rajesh Tope
- Advertisement -
दरम्यान, शासकीय डॉक्टर बरोबरच, खासगी डॉक्टर यांना सुद्धा विमा सुरक्षा कवच आहे. आयएमएची मागणी मान्य केली आहे. खासगी डॉक्टर यांनीही आणखी जास्त रुग्णसेवेसाठी पुढे यावे, असेही मंत्री टोपे यांनी सांगितले.