Friday, October 4, 2024
Homeमनोरंजनसुपरस्टार रजनीकांत पडले CM योगींच्या पाया, Video व्हायरल

सुपरस्टार रजनीकांत पडले CM योगींच्या पाया, Video व्हायरल

दिल्ली | Delhi

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या ‘जेलर’ चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहे. जेलर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली असून, अद्यापही यशस्वी वाटचाल सुरु आहे.

- Advertisement -

यादरम्यान, रजनीकांत वेगवेगळ्या राज्यांचा दौरा करत असल्याचा दिसत आहेत. नुकतंच रजनीकांत आपल्या चित्रपटाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशात पोहोचले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी एकत्र चित्रपट पाहिला. पण दोघांची ही भेट एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

रजनीकांत यांनी शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या लखनऊमधील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. जेव्हा रजनीकांत यांचं आगमन झालं तेव्हा आदित्यनाथ यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. दरम्यान, गाडीतून उतरल्यानंतर रजनीकांत योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडले. योगी आदित्यनाथ यांच्या तुलनेत रजनीकांत वयाने मोठे असल्याने त्यांनी पाया पडणं अनेकांसाठी भुवया उंचावणारं ठरलं आहे. रजनीकांत योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ग्राहकांनो सावधान! कॅडबरीमध्ये निघाल्या अळ्या व अंडे

जेलर चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपट बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी करत आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांनंतर रजनीकांत यांचा एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जेव्हा-जेव्हा रजनीकांतचा चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा दक्षिणेत जल्लोष असतो. रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट 900 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. रजनीकांत यांनी ‘जेलर टायगर’ची भूमिका साकारली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या