Tuesday, March 25, 2025
Homeजळगावआ.भोळेंनी घेतली ईश्वरबाबुजी, प्रदीप रायसोनींची भेट

आ.भोळेंनी घेतली ईश्वरबाबुजी, प्रदीप रायसोनींची भेट

जळगाव । प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील राजकारणात चाणक्य समजले जाणारे माजी महापौर प्रदीप रायसोनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खा. ईश्वरबाबुजी जैन यांची आ. राजूमामा भोळे यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. गुरुवारी सकाळी पहिल्या टप्प्यात आ. राजूमामा भोळे यांना गणपती नगर, रामेश्वर कॉलनी भागांमध्ये प्रचार रॅली काढली.
आ. राजूमामा भोळे यांनी गुरुवारी सकाळी गणपती नगरातील श्री गणपतीचे दर्शन घेऊन पहिल्या टप्प्यातील रॅलीला सुरुवात केली.

तेथून गणपती नगर, आदर्श नगर, जीवन मोती सोसायटी, रामेश्वर कॉलनी, विश्वकर्मा नगर, राजपूत गल्ली मार्गे स्वामी समर्थ चौकात समारोप केला. दरम्यान, आमदार राजूमामा भोळे यांनी रॅली मार्गात माजी महापौर प्रदीप रायसोनी, माजी खासदार ईश्वरबाबूजी जैन, उद्योजक यशवंत बारी, माजी नगरसेविका रेखा पाटील, ज्योती चव्हाण, सदाशिवराव ढेकळे, राजेंद्र घुगे पाटील आदी मान्यवरांच्या घरी भेट दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनीष जैन यांनी प्रचारात सहभाग घेतला. रॅलीत उज्वलाताई बेंडाळे, नितीन इंगळे, विशाल त्रिपाठी, ललित कोल्हे, विनोद देशमुख, दीपक सपकाळे, अशोक पारधे, राजूभाई मोरे, अनिल अडकमोल, दीपक सूर्यवंशी, सदाशिवराव ढेकळे, रेखा पाटील, राजेंद्र घुगे पाटील, ज्योती चव्हाण, अनिल देशमुख, महादू सोनवणे, मीनल पाटील, गौरव ढेकळे, मधुकर ढेकळे, पृथ्वीराज सोनवणे, महेश कापुरे, महेश जोशी, राहुल वाघ, आशुतोष पाटील, राहुल कुलकर्णी, विनोद मराठे, प्रकाश बालाणी, वैशाली पाटील, रेखा कुलकर्णी, शोभा कुलकर्णी, माधुरी देशमुख, गणेश सोनवणे, कुंदन काळे, पियुष कोल्हे, उमेश सोनवणे, लता मोरे, अर्चना कदम, ममता तडवी, शोभा भोईटे, मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, अक्षय मेघे उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...