Wednesday, February 4, 2026
Homeजळगावराजूमामांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत

राजूमामांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत

जळगाव । प्रतिनिधी
ईश्वर कॉलनीत रविवारी दुपारी जळगाव शहर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश भोळे यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत, फुलझाडी, फुलबाज्या उडवित दिवाळी साजरी करीत नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी जेष्ठ नागरिकांनी आ. भोळे यांना विजयासाठी भरभरून आशीर्वाद दिले.आपला माणूस, आपला आधार, राजूमामाच आमदार या शीर्षकाखाली एका भगिनीने काढलेली रांगोळी रॅली मार्गात लक्ष वेधून घेत होती.

ईश्वर कॉलनीतील कृपाळू साईबाबा मंदिर येथे पूजा व आरती करून आमदार भोळे यांनी प्रचाराला सुरुवात केली. ईश्वर कॉलनी, लक्ष्मी नगर, सम्राट कॉलनी, जोशी कॉलनी, नाथवाडा, नवल कॉलनी, सिंधी कॉलनी मार्गे पूज्य समाधा आश्रम येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीत जेष्ठ नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून आ. राजूमामा भोळे यांना भरभरून आशीर्वाद दिले. अनेक तरुणांनी तर शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. रेश्मा काळे, गोपाल पोपटानी, विनय केसवानी, अशोक मंधान आदींच्या घरी आमदार भोळे यांनी भेट देऊन चर्चा केली. रॅलीत दीपक सूर्यवंशी, गोपाल पोपटानी, विनय केसवानी,मनोज आहुजा, रजनी अत्तरदे, भगत बालाणी, अ‍ॅड.दिलीप पोकळे, गणेश सोनवणे, ज्योती चव्हाण, सुरेश लुल्ला, आशु रावलानी, हेमंत जोशी, विकी चौधरी, सोनू वैष्णव, प्रसन्ना बागल, दीपक जोशी, उषा परदेशी, विवेक नाथानी, विकी सोनार, ज्ञानेश्वरी कांडेलकर, दिनेश प्रजापत उपस्थित होते.

- Advertisement -

मनसेचे 80 पदाधिकारी भाजपात
आ. राजूमामा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मनसेचे विभाग प्रमुख हर्षल माहाडीक यांच्यासह दर्शन पाटील, पंकज पाटील, मयुर पाटील, दुर्गेश पाटील, आदीनाथ जाधव यांच्यासह 80 कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

YouTube video player

ताज्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देणार?;...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' ही सर्वाधिक चर्चेची आणि लोकप्रिय ठरलेली योजना आहे. मात्र, आता ही योजना केवळ महिलांच्या...