Tuesday, January 6, 2026
HomeनगरAkole : राजूर ग्रामपंचायतीत 3 कोटी 73 लाखांचा अपहार

Akole : राजूर ग्रामपंचायतीत 3 कोटी 73 लाखांचा अपहार

कारवाईला विलंब, संतप्त ग्रामस्थ राजूर ग्रामपंचायतीला आज टाळे ठोकणार

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील राजूर ग्रामपंचायतीत तब्बल 3 कोटी 73 लाखांचा आर्थिक घोटाळा झाल्याचे चौकशी समितीच्या अहवालातून समोर आले आहे. पंचायत समितीच्या राहाता गटविकास अधिकार्‍यांच्या समितीने तयार केलेला अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी, अकोले यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतरही स्थानिक प्रशासनाकडून कारवाईला विलंब होत असल्याचा आरोप युवा नेते सचिन देशमुख व अन्य ग्रामस्थांनी केला आहे.

- Advertisement -

दरम्यान या निष्क्रियतेमुळे संतापलेल्या माजी सरपंच गणपत देशमुख, सचिन देशमुख, अक्षय देशमुख, निलेश साकुरे, दौलत देशमुख, किशोर देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी गटविकास अधिकार्‍यांशी चर्चा केली. मात्र त्यांच्या कडूनही कारवाई बाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने आज मंगळवार दिनांक 25 रोजी राजूर ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. 2023-24 व 2024-25 या कालावधीत पाणीपुरवठा, नागरी सुविधा, रस्त्याचे विविध कामे केले गेले. तर काही ठिकाणी कामे केलेच नाही. परंतु बिले वाढीव करण्यात आले.

YouTube video player

सरपंच व सदस्य यांनी पैशाचा अपहार केला. दप्तरासह विविध खात्यांमध्ये मोठा आर्थिक अपहार झाला. दोन महिने उलटूनही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला आहे. आमदार डॉ. किरण लहामटे यांचा स्थानिक प्रशासनावर दबाव असल्याचे सचिन देशमुख यांचे म्हणणे आहे. गटविकास अधिकारी व विस्तार अधिकार्‍यांनी कारवाईला विलंब करत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सचिन देशमुख यांनी सांगितले की, अहवालात अनियमितता स्पष्ट असूनही अधिकारी कारवाई करत नाहीत. आम्ही ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार आहे. या इशार्‍यामुळे राजूरमध्ये आज मंगळवारी तणाव निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनावर आता तातडीने कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे.

राजूर ग्रामपंचायत तक्रारी बाबतची चौकशी झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून आलेल्या अहवालाची पडताळणी सध्या सुरु आहे.
– अमर माने, गट विकास अधिकारी, अकोले

ताज्या बातम्या

सोनिया

काँग्रेस खासदार सोनिया गांधींची तब्येत अचानक बिघडली; रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकाँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी त्यांची...